Ticker

6/recent/ticker-posts

भाज्यांचे दर गगणाला, गृहिणींचे बजेट कोलमडले

• ग्रामीण परिसरात गृहिणीचा कल रानभाज्याकडे 

• भाजीपाला व्यवसायिक मालामाल

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324

भंडारा :- संततधार पाऊस व अतिवृष्टीने सीमावर्ती जिल्हे व राज्यातून भाजीपाल्याची सब्जी मंडीत आवक झाली नाही. तसेच उपलब्ध असलेला भाजीपाला काही प्रमाणात सडल्याने मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्यामुळे भाज्यांचे दर गगनाला भिडलेले आहेत. या प्रकाराने गृहिणींचे बजेट कोलमडण्याचे मार्गावर असून ग्रामीण परिसरातील महिलांनी रान भाज्यांना पसंती दर्शविल्याचे चित्र तालुक्यासह जिल्ह्यात दिसत असले तरी दरवाढीमुळे भाजीपाला व्यवसायिक मात्र मालामाल होत आहेत. 
              नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यां बरोबर सामन्य नागरिकांनाही बसला असून जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच शेजारील राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आलेल्या पुरामुळे परराज्यातुन भाज्याची आवक कमी झाल्यामुळे भाज्यांचे भाव कडाडले आहेत. जिल्हयातील प्रत्येक भाजी मंडीत पावसामुळे भाज्यांच्या पिकाचे नुकसान झाल्याने भाज्यांची आवक ही कमी झाली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर वाढले आहेत. मागील आठवड्यात सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे सर्वाधिक नुकसान भाजीपाल्याचे झाले आहे. जाग्यावरच फळभाज्या आणि पालेभाज्या खराब झाल्याने चांगल्या भाज्यांची घटली. परिणामी मागणी अधिक आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती निर्माण झाल्याने भाज्यांचे दर गगणाला भिडले आहेत. पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झाले. त्यांचा थेट परिणाम भाज्यांवर झाल्यांचं दिसून येत आहे. भाज्यांच्या भाव कडाडल्यामुळे ग्राहकांची देखील तारांबळ उडाली आहे. त्यामुळे गृहिणीचे आर्थिक बजेट कोलमडले असून असेच दर राहिले तर जेवणाच्या ताटातून हिरवा भाजीपाला बाद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाजी बाजारात आवक कमी झाल्यामुळे भाज्यांचे दर वाढले आहेत. कोभी १०० रू.प्रति किलो टोमॅटो १३० प्रती किलो, तोंडली ६० रू. प्रती किलो, प्रती किलो, मिरची १६० रू. प्रती किलो, वांगे ६० रू. प्रती किलो, भोपळा ६० रु. प्रती किलो, शिमला ८० रु. किलो कारली १२०रू किलो, चवळी शेंग १२० रु. प्रती किलो, भेंडी ८० प्रती किलो तसेच पाल्यभाज्या चवळी, मेथी, पालक, राजगिरा यांचे प्रति किलो १०० रुपयाच्या दराने बाजारात उपलब्ध आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा दुपटीने ते तिपटीने भाव वाढलेत.. कोथिंबीर, टोमॅटो, मेथी, गवार शेंगा, दोडका सर्वच भाज्या महागल्या आहेत. पुढील काही आठवडे भाज्यांचे दर असेच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात असले तरी गृहिणीचे आर्थिक बजेट कोलंमडल्याने ग्रामीण भागातील महिलांचा कल रानभाज्याकडे वळला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या