Ticker

6/recent/ticker-posts

हिमायतनगर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कुठल्याही प्रकारची पंचनामे नकरता तात्काळ मदत जाहीर करा.

वंचित बहुजन आघाडी हिमायतनगरचे मा.तालुकाअध्यक्ष डॉ रविराज दुधकावडे यांची मागणी.
                                                
लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड  
मो.9689821132 

 हिमायतनगर -: येथे वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते गोविंद गोखले यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा सदस्य लक्ष्मण पांचाळ सरसमकर यांच्या उपस्थितीत बहुजनांचे कैवारी आदरणीय श्रेदेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांचे कट्टर समर्थक व हिमायतनगरचे तालुका उपाध्यक्ष संतोष खिल्लारे, तालुका उपाध्यक्ष तथा यूवा नेते संभाजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच हिमायतनगर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे ढाण्या वाघ तथा युवा नेते शरद हानवते , युवा नेते आतिश सावते, युवा नेते कपिल वाठोरे,मातंग समाज नेते संजय गुंडेकर यांच्या समवेत आज हिमायतनगर तालुका तहसीलदार शेंडे साहेब यांना तालुक्यात मागील सात दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.आगोदरच उशिरा झालेल्या पेरण्या मुळे शेतकरी राजा परेशान आहे.जगाचा पोशिंदा आसणाऱ्या शेतकरी राजा अडचणी सापडला आहे.तेव्हा तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी हिमायतनगर कार्यकारिणीच्या वतीने मा.तहसिलदार यांना निवेदन देऊन तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनचे शेतातील पिकांचे नुकसान पाहुन पंचनामे करण्यात वेळ न घालता तात्काळ हिमायतनगर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून सरसकट सर्व शेतकरी बांधवांना मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे.या मागणीच्या निवेदनावर अनेक पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या