Ticker

6/recent/ticker-posts

सात्यांची आवक घटल्याने गगनाला भिडले भाव

• हवामानाचा परिणाम

• १००० रुपये दराने विक्री

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा
मो.9545914324


भंडारा:- या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये दमट हवामानाचा निसर्गावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. या मोसमामध्ये नैसर्गिक वनसंपदा म्हणून जंगलात मिळणारी मशरूमचा(सात्या) रानभाजी या श्रेणीत समावेश होत नसला तरी नैसर्गिकरित्या मातीच्या कुशीत उगविणारा हा सात्या सर्वांना हवाहवासा व आवडीचा आहे. यंदा पावसाच्या दिरंगाईमुळे सात्यांचे आगमन उशिरानेच झाले आहे. सध्या सात्याचे भाव गगनाला भिडले असले तरी खवय्यांकडून मागणी अधिक आहे. 
             यावर्षी दमदार पाऊस होऊन जमिनीत पुरेसे पाणी मुरले की वारूळ, पालापाचोळा, कचरा, अशा ठिकाणी जंगलामध्ये सात्या निघायला सुरुवात होते. परंतु दमट हवामानाचा निसर्गावर परिणाम होऊन सात्या कमी निघण्यास सुरुवात झाली. सात्याची (मशरूम) उगवण क्षमता कमी असलीतरी सरपटणारे प्राण्यामुळे जंगलात सकाळी जाऊन मशरूम खोदून आणण्याचे काम जोखमीचे असते आणि त्यांना स्वच्छ पाण्याने धुवून त्याची विक्री केली जाते. वर्षातून एकदा खवय्यांच्या जिभेला चव पुरविणारी ही साती सध्या शहरी भागात सर्वत्र कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे. बाजारात सात्या आठवडाभरापासून ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध आहेत. परंतु, उगवण क्षमता कमी झाल्याने आदिवासी तसेच ग्रामीण भागातील जनतेचा अल्प कालावधीचा रोजगार असणारी साती जंगलात मिळत नसल्याने रोजीरोटी हिरावली असून सात्यांचे भाव कडाडले आहेत. दोन तीन दिवसांपूर्वी एक हजार रुपये प्रति किलोप्रमाणे मिळणाऱ्या सात्या आता चढ्या विकल्या जात आहेत.
           त्याचा थेट परिणाम बाजारावर होत आहे. सात्यांची आवक घटल्यामुळे भाव वाधारले असून बाजारात पुरवठा कमी असल्याने मागणी वाढली आहे. पाहिजे त्या दराने मशरूम विकत घ्यावे लागत आहे. जंगलात अनेक प्रकारच्या मशरूम(सात्या) उगवत असल्यातरी मोजक्याच प्रजाती खाण्यायोग्य असून डुंबर सात्या, तनस सात्या, अननस सात्या, वेळू सात्या असे काही प्रकारचे खाण्यायोग्य व औषधीयुक्त जंगली प्रजातीच्या सात्यांचा वापर केला जातो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या