Ticker

6/recent/ticker-posts

तुम्ही आमच्या घरात राहु नका ?सावत्र मुलांनी केली विधवा सावत्र आईला मारहाण,

पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल

औरंगाबाद जिल्हा विशेष प्रतिनिधी, गौतम सोनवणे.
मो.8308128457,

पैठण तालुक्यातील खामजळगाव येथील विमलबाई भाऊसाहेब कर्डिले ही विधवा महिला आपल्या घरात एकटी राहत असतांना फिर्यादी विधवा महिला व त्यांचे सावत्र मुले यांचा शेतीचा वाद न्यायालयात चालु असतांना सावत्र मुले नामे राजेंद्र भाऊसाहेब कर्डीले,दिगंबर भाऊसाहेब कर्डीले व दत्तत्रय भाऊसाहेब कर्डीले,रा.गळनिंब ता गंगापुर जि.औरंगाबाद हे दि.३/८/२०२३ वार गुरुवार रोजी दुपारच्या १:०० वाजेच्या दरम्यान विभवा महिला विमलबाई भाऊसाहेब कर्डीले यांच्या घरी आले असता सावत्र आईला घरात एकटी पाहुण या तिघा भावाने संगमत करुण त्या सावत्र आईला म्हणाले की,तुम्ही आमच्या घरात राहु नका,आमच्या घरा का राहता,तुम्ही आमच्या घरातुन बाहेर हो,असे म्हणुन त्या तिघा भावांनी संगमत करुन सावत्र आईला चापट लाथबुक्यानी मारहाण करुन शिविगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली.दरम्यान त्या सावत्र आईने स्वत:चे दोन मुले बाहेरगावी पोट भरण्यासीठी गेलेले असतांना विजय भाऊसाहेब कर्डिले,व अमित भाऊसाहेब कर्डीले यांना फोन करुन बोलावुन घेतले व घडलेला सर्व प्रकार आपल्या मुलांना सांगितला. व बिडकीन पोलीस ठाण्यात तक्रार दिली.त्या सावत्र तीन्ही मुलाविरुध्द नामे राजेंद्र कर्डीले,दिगंबर कर्डीले,व दत्तत्रय कर्डीले यांच्या विरुध्द भारतीय दंड संहिता अधिनियम १८६० कलम ३२३,५०४,५०६,३४ प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास बिडकीन पोलीस करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या