Ticker

6/recent/ticker-posts

पालम येथे वंचित बहुजन आघाडीची पालम तालुका आढावा बैठक संपन्न


रुपाली मेश्राम कार्य.संपादक चित्रा न्युज मो.9552073515

परभणी: - दि.09/08/2023 वार मंगळवार रोजी  वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर आणि प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार परभणी दक्षिण जिल्हाध्यक्ष मा टी डी रुमाले यांच्या अध्यक्षतेखाली गण बांधणी,गायरान धारकांचे अर्ज,प्रशिक्षण शिबीर,क्रियाशील सभासद नोंदणी,प्रबुद्ध भारत पाक्षिक सभासद नोंदणी असा विविध विषयावर पालम तालुका आढावा बैठक संपन्न झाली.

 त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपाध्यक्ष संजय मस्के, जिल्हा उपाध्यक्ष माधव हनवते,जिल्हा उपाध्यक्ष देविदास मस्के,जिल्हा महासचिव मनोहर वावळे, जिल्हा सचिव तथा मीडिया प्रमुख विशाल मस्के, पाथरी तालुका महासचिव अशोक नरवडे व पालम तालुक्यातील तालुका अध्यक्ष वैजनाथ हत्तीआंबीरे,तालुका महासचिव सुधाकर हनवते,पाथरी तालुका महासचिव अशोक नरवडे,कार्यकर्ते रमेश वावडे,तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड,पत्रकार सखाराम शिंदे,ज्ञानोबा शेळके,ज्ञानोबा वाव्हळे,कैलास असले,सुयश कांबळे,सिद्धार्थ कांबळे,बाबुराव कांबळे,अशोक गायकवाड,राजाराम गायकवाड,कोंडीबा गायकवाड, माणिक मोडके,उद्धव मोडके,भीमराव कांबळे,भगवान कांबळे,जानकिरामआसले,राजाभाऊ गोरे आदी कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या