Ticker

6/recent/ticker-posts

तालुका आष्टी पिंपळगाव दाणी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

 रतन जाधव ग्रामीण बीड जिल्हा प्रतिनिधी मो.नं. 7030271408 


बीड : दिनांक १ ऑगष्ट २०२३ रोजी बिड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मौजा पिंपळगाव दाणी येथे आज साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. लोकशाहीर आणि महान साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांची जयंती , कथा , कादंबऱ्या , पोवाडे , लावण्या , लोकनाट्य , पदे , गीते असे विविध साहित्यातून अण्णाभाऊंनी शोषण, अन्याय, अत्याचाराला विरोध करणे हेच त्यांनी ध्येय मानले व मानवी वृत्ती प्रवृत्तीचे वास्तव दर्शन वाचकांना घडविले. अण्णांनी आपल्या शब्दांना अंगाराचे रूप देऊन दलितांच्या निर्जीव मनाला कायम चेतवर ठेवले. अशा महान साहित्यकाची १०३ वी जयंती मौजा पिंपळगाव दाणी येथे साजरी करण्यात आली. 
अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली गावाच्या वाटेगाव या खेड्यात मातंग समाजातील एका कुटुंबात झाला. औपचारिक शिक्षणाचा अभाव असूनही अण्णाभाऊ साठे आणि मराठीतील ३५ कादंबऱ्या , असे अनेक लेख लिहिले. त्यामुळे अण्णाभाऊ साठे हे एक समाज सुधारक आणि लेखक होते. फकीरा या कादंबरीला १९६१ मध्ये राज्य सरकारच्या पुरस्कार मिळाला होता. अण्णाभाऊ साठेच्या लघुकथांचे १५ संग्रह आहेत. त्यांच्या बऱ्याच मोठ्या कथांची भारतीय आणि २७ नॉन - भारतीय भाषांमध्ये अनुवादित करण्यात आली आहे. 
जोशी त्यांच्या आक्रोश शब्दातून मांडणारे थोर समाज सुधारक, लेखक ,कवी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आलेल्या पाहुण्यांनी विनम्र अभिवादन करून आपल्या वाणीतून बोध अमृत पाजले. यावेळी चित्रा न्यूज चे बीड जिल्हा प्रतिनिधी रतन जाधव ,सोन्या घाडगे सर,मच्छिंद्र साळवे,अमोल घाडगे सर, शिवाजी घाडगे ,गोवर्धन जाधव ,सनी शिंदे ,प्रशांत शिंदे ,रामदास गायकवाड ,गणेश शिंदे ,अतुल खराडे सरपंच, पंडीत पोकळे सदस्य , शिवाजी गायकवाड बाळू गायकवाड यांनी कार्यक्रमात सहभागी होऊन उपस्थिती दर्शविली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या