Ticker

6/recent/ticker-posts

भिम शाहीर प्रदीप कळंबे यांचे गीत गायन व जाहीर सत्कार समारंभ संपन्न

कार्यक्रमास विदर्भातून आलेल्या अनेक लोकशाहीर कलावंतांनी लावली हजेरी

भवन लिल्हारे कार्य. संपादक ( चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य ) मो.नं.9373472847

भंडारा : लाखनी तालुक्यातील मौजा केसलवाडा ( लाखनी ) येथे दिनांक १२ ऑगष्ट २०२३ रोजी राष्ट्रीय अमरकला निकेतनच्या संयुक्त विद्यमाने वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ता व विदर्भस्तरीय लोककला महोत्सव " बळगे सेलिब्रेशन सभागृह " केसलवाडा येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाले. या संघटनेचे अध्यक्ष लोकशाहीर मा.अंबादासजी नागदेवे ,  कार्यक्रमाचे उद्घाटक मा.श्री.चरणदासजी मेश्राम, कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय मेश्राम , शाहीर राजेंद्र बावनकुळे , मा.अरुण मेश्राम , शाहीर आर्यन नागदेवे , यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. 
भीम शाहीर प्रदीप कळंबे यांचे सर्वप्रथम पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आले. त्यांच्या बोध अमृतवाणीतून भीम शाहीर मा. प्रदीप कळंबे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर गीत सादर केले.  राष्ट्रीय अमरकला निकेतन सोमलवाडा अंतर्गत गुरुवंदन विदर्भस्तरीय लोककला महोत्सवात आलेल्या लोकशाहीर कलावंतांना सन्मान पत्र देण्यात आले . हे खास , यात लोककलेच्या माध्यमातून समाजातील ज्वलंत प्रश्नांवर निरंतर समाज प्रबोधन व समाज जनजागृतीचे मौलिक कार्य करीत असून परिवर्तनवादी महापुरुषांच्या संकल्पनेतील नवभारत निर्माण करण्याकरिता मोलाची भूमिका बजावून लोककलेच्या वारसा जतन करीत आहात. हे प्रशासकीय कार्याची दखल घेऊन , विदर्भस्तरीय लोककला महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सन्मानपूर्वक सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमास्थळी शाहीर भगवान वानखेडे, सुरज नवघरे, शाहीर ललकार चव्हाण , शाहीर विनोद बागडे , रमेश रामटेके,रवींद्र मेश्राम,भगवान लांजेवार,गजानन वडे,उपस्थित होते.
या कार्यक्रमात विदर्भातून आलेले लोकशाहीर कलावंत यांनी आपली उपस्थिती दर्शविली व कार्यक्रमास्थळी हजेरी लावली . या कार्यक्रमाचे मुख्य संचालन मा. नाशिक चवरे व आभार प्रदर्शन मा. शाहीर आर्यन नागदेवे यांनी केले. व आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या