Ticker

6/recent/ticker-posts

पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात गाय ठार

• निलागोंदी कक्ष क्रमांक १८३ मधील घटना 


• पशुपालकाचे ५३ हजाराचे नुकसान
 
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा
मो.9545914324

भंडारा:- वन विकास महामंडळ महाराष्ट्र यांच्या अखत्यारीत सहवनक्षेत्र सोनेगाव चे अधीनस्त वनरक्षक बीट खुर्शीपार मधील नियतक्षेत्र निलागोंदी कक्ष क्रमांक १८३ मध्ये पट्टेदार वाघाने गाईस ठार केल्याची घटना शनिवारी (ता.१२) सकाळच्या सुमारास उघडकीस आली. पशुपालक होमराज तेजराम हटवार रा.निलागोंदी यांचे अंदाजे ५३ हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. क्षेत्र सहाय्यक  चारुलता मोहरकर यांचे मार्गदर्शनात पंचनामा करण्यात आला आहे. या घटनेने पशुपालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
            होमराज हटवार हे अल्पभूधारक शेतकरी असून शेतीस पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन करतात. त्यांचेकडे आजघडीस ३ गायी, १ गोरी, ४ शेळ्या आहेत. ते स्वतः जनावरे राखण्याचे काम करतात. नेहमीप्रमाणे शुक्रवारला  त्यांनी जनावरे जंगलात  चारण्यासाठी नेले असता जंगलात पट्टेदार वाघाने जनावरांचा पळ काढल्याने  जनावरे अस्तव्यस्त झाल्याने रात्री गाय घरीच आली नाही त्यामुळे सकाळी जंगलात शोधाशोध केले असता कक्ष क्रमांक १८३ मध्ये पट्टेदार वाघाने हल्ला करून गाईला ठार केले. त्यांनी घटनेची माहिती क्षेत्र सहाय्यक चारुलता मोहरकर यांना दिली. त्यांनी बिट खुर्शीपारचे वनरक्षक स्नेहल कपाळे यांना घटनेची माहिती देऊन त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. आजूबाजूला असलेल्या पायाचे ठस्यावरून गुराख्याच्या सांगण्यावरून गाईवर हल्ला करणारा पट्टेदार वाघ असल्याचे निष्पन्न झाले. ४ दिवसापूर्वी याच परिसरात मशरूम बघण्याऱ्या लोकांना व गुराख्याना पट्टेदार वाघ दिसला होता. लागोपाठ घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या