कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324
भंडारा :- लाखनी तालुक्यात बहुतांश शेतजमीन जलसिंचित असून १२० ते १४५ दिवसांत निघणाऱ्या. धानाच्या मध्यम व उच्च प्रजातीच्या धानाची लागवड केली जाते. उत्तरा नक्षत्र संपण्याचे मार्गावर असून चालू खरीप हंगामात समाधानकारक पाऊस झाल्याने धानाचा निसवा सुरू असला तरी ढगाळ वातावरणामुळे धानावर ढेकनाचा(गंधीबग) नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्यामुळे या रोगाचे योग्य व्यवस्थापन होणे आवश्यक आहे.
साकोली व लाखांदूर तालुक्याचे विभाजन करून लाखनी तालुक्याची निर्मिती करण्यात आली. भौगोलिक क्षेत्र भौगोलिक क्षेत्र ३३ हजार १७३.३६ हेक्टर असून पेरणी योग्य क्षेत्र २४ हजार ६९० हेक्टर आहे. खरीप हंगाम २०२३ मध्ये २२ हजार ६४५ हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात आली. त्यात २२ हजार ६५ हेक्टर क्षेत्रात रोवणी तर ५८० हेक्टर क्षेत्रात आवत्या धान लावण्यात आले आहे. तालुक्यात बहुतांश शेतजमीन सिंचनाखाली असल्यामुळे अनेक शेतकरी १२० ते १४५ दिवसांत निघणाऱ्या वायएसआर, महिंद्रा ४०४, सिंधू, सिलकी, ओमश्रीराम, श्री १०१, जयश्रीराम, केसर, चिंटू, १००१, १००८, १०१० या सारख्या मध्यम व उच्च प्रजातीच्या धानाची लागवड करतात. चालू खरीप हंगामात आद्राचे सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्यामुळे धानाची पेरणी करण्यात आली. तसेच रोवणीही मुदतीत आटोपल्यामुळे मध्यम प्रतीच्या धानाचा निसावा सुरू असून उच्च प्रतीचे धान फुलोरावर आहे. असे प्रगतिशील शेतकरी हेमंत(आकाश) कोरे यांनी सांगितले. मागील महिन्यात ढगाळ वातावरणामुळे करपा आणि खोडकिडा रोगाचा धान पिकावर प्रादुर्भाव झाला होता. त्यावर कीटकनाशक फवारणी करून परिस्थिती पूर्व पदावर आणली गेली. पण निसवा होऊ घातलेल्या मध्यम व उच्च प्रजातीच्या धान पिकावर ढेकनाचा(गंधीबंग) ह्या नवीनच रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्यामुळे त्यावर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
अशी आहेत गंधीबग रोगाची लक्षणे
धान पिकावर काही ठिकाणी लोंबिवर ढेकनाचा(गंधीबग) रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. या लोंबीला हाताचा स्पर्श झाला असता आपल्याला उग्र असा घाणेरडा वास येतो. या रोगाचा प्रादुर्भाव फुलोराच्या अवस्थेपासून तर दाण्याच्या दुधाळ अवस्थेपर्यंत असतो. त्यामुळे दाने भरत नाही. धान रंगहीन व पर्णकोष करपा रोगासारखे दिसतात.
असे करावे ढेकनाचा रोगाचे व्यवस्थापन
पावसाळा संपण्याचे कार्यकाळात ढेकनाचा(गंधीबग) या किडीचे प्रमाणात वाढ होते. फुलोराच्या अवस्थेत ५ गंधीबग दाण्याचे दुधाळ अवस्थेत १६ गंधीबग प्रती १०० लोंब्या आढळल्यास ईमीडाकलोप्रिड ७ टक्के अधिक लॉमडा सहेहालोथ्रीन ४ टक्के प्रवाही ह्या मिश्र कीटकनाशकाचे ६ मिली लिटर पाण्यात प्रती एकरी १२० मिली २०० लिटर पाण्यात मिसळून सकाळी किंवा सायंकाळी फवारणी करावी.
प्रतिक्रिया
धानाचे फुलोर अवस्थेपासून दाण्याचे दुधाळ अवस्थे पर्यंत ढेकनाचा(गंधीबग) रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. धान पिकावर हा रोग आढळल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाचे सल्ल्याने सुरक्षा उपकरणे वापरून कीटकनाशक फवारणी करावी.
के.एन. चव्हाण, कृषी विस्तार अधिकारी, प. स. लाखनी
प्रतिक्रिया
मागील महिन्यात वातावरणातील बदलामुळे मध्यम व उच्च प्रतीच्या धानावर ढेकनाचा(गंधीबंग) रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले असल्याने उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे.
आकाश कोरे, प्रगतिशील शेतकरी


0 टिप्पण्या