🌞 दिन विशेष 🌞
इसवी सन २०२३ - २ ऑक्टोबर
शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत २०७९
भा. रा. १० आश्विन १९४५.
युगाब्द ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : दक्षिणायन
ऋतू : वर्षा
मास : भाद्रपद
पक्ष : शुक्ल
तिथी : तृतीया (०७.३०) ~ चतुर्थी
वार : सोमवार
नक्षत्र : भरणी (१८.२०) ~ कृत्तिका
राशी : मेष (२४.१०) ~ वृषभ
चतुर्थी श्राद्ध
भरणी श्राद्ध
*संकष्ट चतुर्थी* (चंद्रोदय रात्री ८.३०)
*संत बहिणाबाई कुलकर्णी पाठक पुण्यतिथी* शिऊर, वैजापूर, छ. संभाजीनगर
जागतिक अहिंसा दिन
स्वच्छता दिन
बालसुरक्षा दिन
*म. गांधी जयंती*
*लाल बहादूर शास्त्री जयंती*
१९०९: रमाबाई रानडे यांनी पुणे सेवासदन सोसायटीची स्थापना केली.
१९२५: जॉन लोगी बेअर्ड यांनी पहिल्या दूरदर्शन संचाचे प्रात्यक्षिक .दाखवले.
१९५५: पेरांबूर येथे इन्टिग्रल कोच फॅक्टरी सुरू झाली.
१९६९: महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांची प्रतिमा व सही असलेल्या २, ५, १० व १०० रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेने जारी केल्या.
१९९२: झी टीव्ही चे संस्थापक सुभाषचंद्र यांनी देशातील पहिल्या खाजगी उपग्रह वाहिनीची सुरूवात केली.
२००६: निकेल माइन्स, पेनसिल्व्हानिया येथे चार्ल्स कार्ल रॉबर्ट्सने आमिश शाळेत पाच शाळकरी मुलींना गोळ्या घालून ठार मारले व नंतर आत्महत्या केली.
जन्मदिवस
१८६९: मोहनदास करमचंद उर्फ महात्मा गांधी (पोरबंदर गुजरात)
१८९१: शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर शिल्पकार, १९२३ मधे पुण्याच्या श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलच्या आवारात बसवलेला शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा त्यांनी बनवला आहे. पद्मश्री (१९६४)
१९०४: भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांचा मुगलसराई उत्तरप्रदेश येथे जन्म. स्वतंत्र भारताचे तिसरे पंतप्रधान. त्यांना मरणोत्तर ’भारतरत्न’ सन्मानाने गौरविण्यात आले
१९०८: विचारवंत व साहित्यिक, पुरोगामी चळवळीचे भाष्यकार गंगाधर बाळकृष्ण सरदार तथा गं. बा. सरदार, दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (१९७८), बार्शी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (१९८०)
१९४२: चित्रपट अभिनेत्री आशा पारेख
१९४८: अभिनेत्री, मॉडेल आणि लेखिका पर्सिस खंबाटा
मृत्यूदिन
१७००: संत तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन झाल्यावरही ज्यांची निष्ठा पाहून तुकोबारायांनी स्वप्नात येऊन साक्षात दर्शन व गुरुपदेश दिला अशा महान संत बहिणाबाई कुलकर्णी पाठक. विशेष माहितीसाठी खालील
दुवा पहा.
https://santmahant.in/sant-bahinabai-information-in-marathi/
१९०६: चित्रकार राजा रविवर्मा.
१९६४: प्रसिद्ध भारतीय राजकारणी व कार्यकर्त्या, स्वतंत्र भारतातील पहिल्या महिला आरोग्यमंत्री राजकुमारी अमृत कौर.
१९७५: स्वातंत्र्यसैनिक, खासदार व तामिळनाडुचे मुख्यमंत्री के. कामराज
*।। दास-वाणी ।।*
तितुक्यांची अंतरें धरावीं ।
विवेकें विचारें भरावीं ।
कडोविकडीचीं विवरावीं ।
अंत:कर्णे ।।
किती लोक तें कळेना ।
किती समुदाव आकळेना ।
सकळ लोक श्रवणमनना ।
मध्ये घाली ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : १९/१०/१०-११
महंताने जे लोक भेटीला येतील त्या सर्वांच्याच अंत:करणाचा ठाव घ्यावा. त्यांना संयमाने विवेकाने वागून विचार करायला शिकवावे. लोकांच्या मनातील शंका कुशंकांचे पूर्ण निरसन करावे म्हणजे ते आपल्या कार्यात समरसून सहभागी होतील.
मग त्याची महंती सर्वदूर पसरेल. त्याचे नेतृत्व मानणारे असंख्य लोक, गट किंवा समुदाय तयार होत राहतील. या बहुसंख्येने जमलेल्या अनुयायांना तो एकटा श्रवण मनन चिंतनामधे गुंतवून ठेवेल अशी क्षमता त्या महंतामधे ईश्वरकृपेने आपोआपच निर्माण होईल.
विवेकलक्षणनिरूपण समास.
🙏 💐💐💐💐 💐 🙏


0 टिप्पण्या