Ticker

6/recent/ticker-posts

दिघोरी येथे स्वच्छतेसाठी श्रमदानास सरसावले शेकडो हात

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324

भंडारा :- १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता पंधरवडा अंतर्गत "स्वच्छता हीच सेवा" चे आयोजन करण्यात आले होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रविवार(ता.१) रोजी एक तारीख एक तास एक साथ स्वच्छतेसाठी श्रमदानाचे आवाहन केले होते. यास लाखनी तालुक्यातील  दिघोरीकर ग्रामवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गावकऱ्यांचे सहकार्याने सरपंच शरद इटवले, भगीरथ भात गिरणी अध्यक्ष बी. डी. बोरकर, पोलिस पाटील अजय खोब्रागडे यांचे नेतृत्वात श्रमदान करण्यात आले. 
              "स्वच्छ भारत मिशन" योजनेला ९ वर्षे पूर्ण झाली. त्याप्रित्यर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "मन की बात" १०५व्या भागात १ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:०० वाजता एक तारीख एक तास एक साथ सर्व नागरिकांनी एकत्र येऊन स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याचे आवाहन करून हीच गांधी जयंतीच्या पूर्व संध्येला महात्मा गांधींना स्वच्छ श्रद्धांजली ठरेल. असे आवाहन केले होते. दिघोरी ग्रामपंचायतीने या आवाहनास प्रतिसाद देऊन सरपंच शरद इटवले, उपसरपंच संध्या कुळमते, भगीरथ भात गिरणी अध्यक्ष बी. डी. बोरकर, पोलिस पाटील अजय खोब्रागडे, ग्रामपंचायत सदस्य तुळसीदास हलमारे, आशिष खोब्रागडे, धनराज मेश्राम, ग्रामपंचायत सदस्या नाजूका जांभूळकर, सरिता शेंडे, रत्नमाला खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्ता वासुदेव रणदिवे, आत्माराम खोब्रागडे, संतोष हलमारे, युवक मंडळी तुषार राघोर्ते, सौरभ खोब्रागडे, विशाल निरगुळे, पाणी पुरवठा कर्मचारी राधेश्याम निरगुळे, संगम खोब्रागडे, संदीप इटवले यांच्या पुढाकाराने तथा गावकऱ्यांच्या सहकार्याने संपूर्ण गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामुळे गावातील रस्त्यांचे स्वरूप पालटल्याचे चित्र दिसत होते. स्वच्छतेमुळे गावकऱ्यांना निरोगी राहण्यास काही ना काही प्रमाणत मदत होईल. असा गावकऱ्यांनी मनोदय व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या