Ticker

6/recent/ticker-posts

सोन्या चांदीचे दागिने व रोख रकमेसह १ लाख ८७ हजाराचा मुद्देमाल लंपास


• कोलारी/पट येथील घटना

• संशयित युवक पोलिसांच्या ताब्यात 

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324

भंडारा :-लाखनी तालुक्यातील पालांदूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोलारी/पट येथे अज्ञात चोराने घरी कोणी नसल्याची संधी साधून दिवसा ढवळ्या घरात प्रवेश करून लोखंडी कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले ५२ ग्राम सोने किंमत १ लाख २४ हजार ५०० रुपये, चांदीचे दागिने व शिक्के २३० ग्राम ४६ हजार रुपये व रोख १६ हजार ५०० असा एकूण १ लाख ८७ हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शनिवार(ता.३०) ला सकाळी उघडकीस आली. अशोक उके यांचे फिर्यादी वरून पालांदुर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संशयित युवकास ताब्यात घेण्यात आले असून वृत्त लिही पर्यंत त्याची चौकशी सुरू होती. 
                फिर्यादी अशोक उके हे शनिवारी सकाळी ८:३० वाजता दरम्यान घराचे समोरील लोखंडी दरवाज्याचे हॅण्डल टेकवून गावातील चौकात असलेल्या किराणा दुकानामध्ये जाऊन बसले होते. तर त्यांची पत्नी अंगणवाडी मध्ये कामाला गेली होती. अशोक काही वेळाने घरी आल्यानंतर त्याचे पत्नीने किराणा सामान आणण्यासाठी लोखंडी आलमारीत ठेवलेल्या पर्स मधील पैसे काढण्यासाठी पाहिले असता पर्स बाजूला ठेवलेली तथा पर्स मध्ये असलेले १ हजार ५०० रुपये दिसून आले नाही. त्यामुळे त्यांचा संशय बळावला असता पती पत्नीने लोखंडी कापाटातील लॉकर मध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम ज्यामध्ये जुने वापरलेले सोने ५२ ग्राम किंमत १ लाख २४ हजार ५०० रुपये, चांदीचे दागिने व शिक्के २३० ग्राम किंमत ४६ हजार तथा रोख १६ हजार ५०० रुपये असा एकूण १ लाख ८७ हजार रुपयायाचा  मुद्देमाल कोणीतरी अज्ञात इसमाने दिवसा घरात प्रवेश करून चोरून नेल्याची खात्री झाल्याने पालांदूर पोलिस ठाणे गाठून  फिर्याद दिली. 
                घटनेचे गांभीर्य ओळखून क्षणाचाही विलंब न लावता सहाय्यक पोलीस निरीक्षक विरसेन चहांदे यांनी पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुशांत सिंग यांना घटनेची माहिती दिली. तथा पोलिस उपनिरीक्षक प्रेमनाथ ठवकर, पोलिस हवालदार मेश्राम, पोलिस शिपाई नावीद पठाण, तिरपुडे, वाढीवे यांचे पथकासह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. चोरी करण्याच्या पद्धतीवरून चोरी कोण करू शकतो. या बाबद विचारपूस केली असता गावातीलच एका युवकावर संशय बळावल्याने संशयित म्हणून त्याला ताब्यात घेण्यात आले. वृत्त लिही पर्यंत त्याची विचारपूस करणे सुरू असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विरसेन चहांदे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या