Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षक संघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा


• विविध संघटनांचा पाठिंबा

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324

भंडारा :- "आम्हाला फक्त शिकू द्या जिल्हा परिषद शाळा टिकू द्या" अशी आर्त हाक देत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा महात्मा गांधी जयंती निमित्त सोमवार २ ऑक्टोबर रोजी दुपारी १:०० वाजता विराट आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेतृत्वात जिल्हा भरातील अनेक शिक्षक संघटनांनी एकीची वज्रमूठ आवळत या मोर्चाला पाठिंबा जाहीर केला आहे. शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभरात आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. संघाचे भंडारा जिल्हा अध्यक्ष मुबारक सैय्यद यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद इमारती पासून जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे मोर्चा काढला जाईल. जिल्हाधिकारी कार्यालयापुढे मोर्चाचे सभेत रूपांतर होईल. त्यानंतर जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांना निवेदन दिले देण्यात येईल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षक, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सदस्य तसेच शालेय व्यवस्थापन समिती सदस्य तसेच समाजातील बांधवांनी गोरगरिब मुलांच्या शाळा वाचविण्यासाठी मोर्च्यात सामील होण्याचे आवाहन जिल्हा अध्यक्ष मुबारक सैय्यद, सरचिटणीस शंकर नखाते, शिक्षक नेते शिलाकुमार वैद्य,कार्याध्यक्ष मनोहर कहालकर, कोषाध्यक्ष विजय चाचेरे, संजीव बावनकर, दिलीप बावनकर, रमेश काटेखाये, मुकेश मेश्राम, राजू सिंगणजुडे, हितेश उईके, अशोक मेश्राम, राजन सव्वालाखे, अनिल गयगये,दशरथ जीभकाटे, सुधीर माकडे, योगेश कुटे, तुलसीदास पटले, प्रमोद हटेवार तथा संघाच्या जिल्हा व तालुका पदाधिकारी यांनी केले आहे.
*जिल्ह्यातील विविध संघटनांचा पाठिंबा(चौकट)*
जि.प.माध्यमिक शिक्षक संघटना, जि.प. माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य पदवीधर शिक्षक महासंघ, जुनी पेन्शन हक्क संघटना, जिल्हा परिषद केंद्र प्रमुख संघटना, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ ह्या संघटनांनी आक्रोश मोर्चास पाठिंबा दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या