Ticker

6/recent/ticker-posts

क्षुल्लक कारणावरून मारहाणीत हात मोडले

• कोलारी येथील घटना 

• पालांदूर पोलिसांत गुन्हा दाखल

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324

भंडारा :- लाखनी तालुक्यातील पालांदूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोलारी/पट येथे क्षुल्लक कारणावरून झालेल्या मारहाणीत हात मोडल्याची घटना शुक्रवार(ता.२९) रोजी घडली. आरोपीचे नाव हितेश गोविंदा भंडारी(३५) रा. कोलारी, तालुका लाखनी असे आहे. भास्कर झलके(५०) रा. धानला(खराशी) यांचे फिर्यादी वरून तथा वैद्यकिय अहवालावरून पालांदूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अमलदार दिलीप भोयर तपास करीत आहेत. 
            भास्कर झलके हे पशुपालक असल्यामुळे दुग्ध व्यवसाय करतात. दूध विक्रीसाठी उमेश झंझाड कोलारी यांचे डेअरी वर दररोज दूध नेतात. दूध मोजून झाल्यावर बावनकुळे यांचे चहा पान दुकानात चहा घेतात. गुरुवारी नेहमीप्रमाणे ते मोटरसायकलवर जनावरांच्या खाद्याचा पोता घेऊन जात असताना बावनकुळे यांचे चहा पानाचे दुकानात चहा पिण्यास थांबले असता हितेश भंडारी आला व माझे वडीलास माझ्या विरुद्ध भडकवतोस परमात्मा धर्मात गेला आहेस असे बोलून भांडण व शिवीगाळ करून तू कोलारी गावात पुन्हा दिसलास तर तुला जीवाने मारीन अशी धमकी दिली व लाथाबुक्क्यांने मारहाण करून ढकलून दिल्याने भास्कर झलके हा सिमेंट रस्त्याच्या बाजूला पडल्याने डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. अशा फिर्यादी वरून तथा वैद्यकिय अहवालावरून पालांदूर पोलिसांनी अपराध क्रमांक १२६/२०२३ कलम ३२५, ५०४, ५०६ भादवी अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विरसेन चहांदे यांचे मार्गदर्शनात पोलिस अमलदार दिलीप भोयर तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या