स्वातंत्र्यलढ्यात उडी घेऊनी बलिदान देऊनी गेले ते.
चालविली नाही बंदूक न चालविले शस्त्र ज्यांनी,
शांततेच्या मार्गानेच लढा दिला त्यांनी.
देशातील प्रत्येकाला सत्य- अहिंसेची शिकवण दिली त्यांनी,
पाकिस्तानला खडे चारूनी भारताचा मान वाढविला त्यांनी.
'' करा किंवा मरा '' हा मंत्र देणारे महामानव होते ते,
'' जय जवान जय किसान '' ही घोषणा देणारे देशभक्त होते ते.
'' मूर्ती लहान पण किर्ती महान " या उक्तीचा प्रत्यय घडवून देणारे,
" साधी राहणी उच्च विचार " प्रत्यक्षात आत्मसात करणारे.
भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारे नेते होते ते,
जगामध्ये राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे महान पुरुष होते ते.
जीवन जगले ते देशासाठी देशच होता त्यांचा प्राण,
स्वतंत्र्य केली भारतमाता ते व्यक्तीमत्व होते महान.
समृद्धी सुजित भोपळे.
वर्ग ८वा
श्री. विवेकानंद कन्या विद्यालय,
नेरपिंगळाई.


0 टिप्पण्या