गौतम सोनवणे जिल्हा विशेष प्रतिनिधी औरंगाबाद
मो.8308128457,
औरंगाबाद :-महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित आयुष्यमान भव या मोहिमेअंतर्गत आरोग्यवर्धिनी उपकेंद्र मुलांनी वाडगावता.पैठण येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अझहर शेख, व प्रा आ केंद्र ढाकेफळच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. यास्मिन शाह यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य मेळाव्याचे शिबिर पार पडले.गावातील गरजु रुग्णानी मोठ्या संख्येने शिबीराचा लाभ घेतला .
शनिवार दि.३०/०९/२०२३सकाळी आयोजित करण्यात आलेल्या
या शिबिरा मध्ये प्रमुख्याने कुष्ठरोग तपासणी, त्वचारोग तपासणी, असंसर्गजण्य आजार या रुग्णांची तपासणी करण्यात आली तसेच शालेय विदयार्थी या सर्व रुग्णांची समुदाय आरोग्य अधिकारी डॉ .गणेश शिंदे यांनी आरोग्य तपासणी केली.
या प्रसंगी सरपंच सौ. वंदना लांडगे, उपसरपंच सतिश शेळके, अनिल लांडगे, धनाजी मिसाळ व ग्रामपंचायत विभागाचे कर्मचारी उपस्थीत होते.
या बरोबर केंद्रीय प्राथमिक शाळा येथे शालेय समितीचे अध्यक्ष विठ्ठल वायकर, ज्ञानेश्वर उघडे, पत्रकार अशोक शहाराव , राहुल उघडे, गणेश उघडे, फारुक शेख, मुख्याध्यापक जगदाळे व शाळेचे शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरोग्य सहाय्यक शिवाजी थोटे, आरोग्य सेवक अशोक हिवाळे, गटप्रवर्तक समिना शेख, जोती लिपाने,आशा कार्यकर्ती सौ. जया जगताप, सौ वर्षा शेळके, सौ.सुमनबाई शहाराव, सौ. लंका गुंजाळ, अल्का घटे, मंदा थोटे यांनी विषेश परिश्रम घेतले.
तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयुष्यमान भव मोहिमे अंतर्गत प्रत्येक शनिवारी या आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे तरी सर्व गरजु रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन समूदाय आरोग्य अधिकारी डॉ. गणेश शिंदे यांनी केले.


0 टिप्पण्या