🌞 दिन विशेष 🌞
इसवी सन २०२३ - ९ नोव्हेंबर
शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत २०७९
भा. रा. १८ कार्तिक १९४५.
युगाब्द ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : दक्षिणायन
ऋतू : शरद
मास : आश्विन
पक्ष : कृष्ण
तिथी : एकादशी (१०.४०) ~ द्वादशी
वार: गुरूवार
नक्षत्र : उत्तरा (२२.००) ~ हस्त
राशी : कन्या
*रमा एकादशी*
*वसु बारस, गो बारस*
*सवत्सधेनु द्वादशी*
*श्री महालक्ष्मी किरणोत्सव, कोल्हापूर*
*भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे पुण्यस्मरण*
*राष्ट्रीय विधी सेवा दिन*
१९१३ : अमेरिकेच्या ग्रेट लेक्स सरोवरांत आलेल्या वादळात १९ जहाजे बुडाली व २५०पेक्षा जास्त व्यक्ती मृत्यू पावल्या.
१९२३: दिनचर्या नावाचे एक पत्र दतात्रय गणेशजी यांनी पुण्यात सुरु केले.
१९३७: जपानी सैन्याने चीनमधील शांघाय शहराचा ताबा घेतला.
१९४७ : भारत सरकारने जूनागढ संस्थान बरखास्त करुन ताब्यात घेतले.
१९६०: रॉबर्ट मॅकनामारा हे फोर्ड मोटर कंपनीचे अध्यक्ष बनले.
१९६३ : जपानच्या मीके खाणीत स्फोट होउन ४५८ ठार, ८३९ दवाखान्यात. याच दिवशी जपानमध्ये योकोहामाजवळ तीन रेल्वेगाड्यांच्या अपघातात १६० ठार.
१९८८: मुंबईतील भारत पेट्रोलियमच्या शुद्धीकरण संकुलातील दुर्घटना, भीषण आगीत १२ जण मृत्युमुखी.
१९९४ : डार्मश्टाटियम या मूलतत्त्वाचा शोध.
२०००: देवभूमी उत्तराखंड राज्य निर्माण झाले व उत्तराखंड उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
२०००: न्यूयॉर्क येथे एका लिलावात पाब्लो पिकासो यांचे एक चित्र पाच कोटी छप्पन्न लाख डॉलरला विकले गेले. पिकासोच्या चित्रासाठी मिळालेली ही विक्रमी किंमत आहे.
२००१: पूर्व पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित केले.
२००५ : आत्मघातकी दहशतवाद्यांनी जॉर्डनच्या अम्मान शहरात केलेल्या बॉम्बस्फोटात ६० ठार.
२०१३ : हैयान या प्रचंड चक्रीवादळाने फिलिपाइन्सचा किनारा गाठला. ताशी ३१५ किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह तुफान पावसात शेकडो मृत्युमुखी.
जन्मदिवस
१८७७ : मोहम्मद इक्बाल, ‘सारे जहाँसे अच्छा’चे कवी, तत्त्वज्ञ आणि राजकीय नेते.
१८८९: प्रसिध्द भारतीय पत्रकार इंद्र विद्या वाचस्पती.
१९०४: पंचानन माहेश्वरी, सपुष्प वनस्पतींतील पुनरुत्पादन क्रियेसंबंधी संशोधन करणारे वनस्पती शास्त्रज्ञ.
१९१८: चोई हाँग हाय, तायक्वोंडो मार्शल आर्ट चे निर्माते.
१९२४: पं. चिंतामणी रघुनाथ तथा सी. आर. व्यास, ख्यालगायक, गुरु व बंदिशकार.
१९३१: एल. एम. सिंघवी, लोकसभा सदस्य, कायदेपंडित, विद्वान, मुत्सद्दी व भारताचे इंग्लंडमधील राजदूत
१९४४: भारतीय कोरिओग्राफर चितेश दास
१९८०: अभिनेत्री व मॉडेल पायल रोहतगी
मृत्यूदिन
१९२२: प्रसिध्द फ्रेंच विदुषक रेमंड डेवोस.
१९४०: नेव्हिल चेंबरलेन, इंग्लंडचे पंतप्रधान
१९४१: संस्कृत भाषेचे पंडित व विद्वान गंगानाथ झा.
१९५२: चेम वाइझमॅन, इस्त्राएलचे पहिले राष्ट्राध्यक्ष
१९६२ : महर्षी धोंडो केशव कर्वे, भारतरत्न, महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपलं १०४ वर्षांचं जीवन वाहिलं, स्त्रीशिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे मराठी समाजसुधारक.
१९६७ : बाबूराव पेंढारकर, मराठी रंगभूमीवरचे गाजलेले खलनायक व चित्रपट अभिनेते.
१९७० : चार्ल्स दि गॉल, फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष.
१९७७: केशवराव भोळेे, सुप्रसिद्ध संगीत समीक्षक, संगीतकार, संगीत दिग्दर्शक व लेखक
२०००: एरिक मॉर्ले, मिस वर्ल्ड स्पर्धेचे निर्माते
२०११: हर गोविंद खुराना, भारतीय-अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते जैविक रसायन शास्त्रज्ञ
२०१३: प्रसिध्द राजस्थानी साहित्यकार विजयदान देथा.
*।। दास-वाणी ।।*
जे अंकित ईश्वराचे ।
तयास सोहळे निजसुखाचे ।
धन्य तेचि दैवाचे ।
भाविक जन ।।
जैसें जयाचें भजन ।
तैसेचि दे समाधान ।
भाव होता किंचित न्यून ।
आपणहि दुरावे ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : ०३/१०/१२-१५
अंकित म्हणजे दास. ईश्वरापाशी जे दास बनून राहतात त्यांना आत्मसुखाचा आनंद आपसूकच मिळतो. असे सुदैवी भाविक खरोखरच धन्य होत.
जसा भक्ताचा भाव त्याच प्रमाणात त्याला भगवंताकडून समाधान मिळते.
भाव किचित जरी दुणावला तर लगेच
भगवंतही तितकाच दूर जातो. परमेश्वर प्रत्येक प्राणीमात्राचे अंतरंग सहजपदिनेश जाणून असतो.
वैराग्यनिरूपण समास.
🙏 💐💐💐💐 💐 🙏


0 टिप्पण्या