चित्रा न्युज प्रतिनिधी
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ऊस उत्पादक शेतकऱ्याला जादा दर द्यावेत तसेच सकल मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी करण्यात येणारी आंदोलने, साखळी उपोषण तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यात्रा, ऊरुस, सण इ. साजरे होणार असून विविध पक्ष, संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांकरिता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारचे आंदोलन करण्यात येत असून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 (The Maharashtra Police Act, 1951) चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये जिल्ह्यामध्ये दिनांक 9 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 7 वाजल्या पासून ते दिनांक 23 डिसेंबर 2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी मनाई आदेश जारी केला आहे.


0 टिप्पण्या