Ticker

6/recent/ticker-posts

व्हॉईस ऑफ मिडियाची जत तालुका कार्यकारणी जाहीर


 तालुका अध्यक्षपदी मच्छिंद्र बाबर, डिजिटल मिडिया अध्यक्षपदी प्रकाश करगणीकर यांची निवड

जिल्हा सदस्यपदी मनोहर पवार, दत्तात्रय सावंत

निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा सदस्य मनोहर पवार, दत्तात्र्यय सावंत आदी उपस्थित  होते.

चित्रा न्युज प्रतिनिधी
सांगली:-  राज्यस्तरावरील व्हॉइस ऑफ मिडिया या संस्थेशी संलग्न असणाऱ्या जत तालुका मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी मच्छिंद्र बाबर, डिजिटल मिडिया अध्यक्षपदी प्रकाश करगणीकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
 जिल्हा कार्यकरणीवर ज्येष्ठ पत्रकार मनोहर पवार, दत्तात्रय सावंत यांची निवड करण्यात आली.

नूतन जिल्हा सदस्य मनोहर पवार, दत्तात्रय  सावंत यांच्या उपस्थितीत जत येथे बैठक पार पडली. या बैठकीत सर्वानुमते व्हॉइस ऑफ मिडियाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. तालुकाध्यक्षपदी मच्छिंद्र बाबर, डिजिटल मिडिया अध्यक्षपदी प्रकाश करगणीकर, कार्याध्यक्षपदी सुभाष कोकळे, तालुका संपर्क प्रमुखपदी संजय कोटगौंड, सचिवपदी वसंत सावंत, उपाध्यक्षपदी बाबासाहेब कांबळे, कल्लाण्णा बालगाव, खजिनदारपदी नारायण भोसले यांची तर प्रसिध्दीप्रमुखपदी संतोष पोरे यांची निवड करण्यात आली.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार नजीरभाई चट्टरगी,
माजी अध्यक्ष राजू माळी, मारुती मदने, सुनील घाडगे, के अजितकुमार, विनोद राठोड, संजय कांबळे आदी उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना नूतन अध्यक्ष बाबर व करगणीकर यांनी जत तालुक्यात व्हॉइस ऑफ मिडियाच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न सोडवू अशी ग्वाही यावेळी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या