Ticker

6/recent/ticker-posts

💐 || सुमंगल सुप्रभात || 💐‌ 🌞 दिन विशेष 🌞

💐  || सुमंगल सुप्रभात ||  💐
‌          🌞 दिन विशेष  🌞
‌
‌इसवी सन २०२३ - ८ डिसेंबर 
‌शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत  २०८०
‌भा. रा. १७ मार्गशीर्ष १९४५
युगाब्द  ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : दक्षिणायन
ऋतू :   शरद
मास : कार्तिक
पक्ष :  कृष्ण    
तिथी : एकादशी (३०.३०) ~ द्वादशी                       
वार :   शनिवार 
नक्षत्र : हस्त (०८.५०) ~ स्वाती
राशी :  कन्या (२१.५०) ~ तुला

उत्पत्ती स्मार्त एकादशी
वैतरणी एकादशी 
*उत्पत्ती भागवत एकादशी उद्या शनिवारी आहे.*

*क्रांतिकारक भाई परमानंद पुण्यस्मरण*
*श्री संताजी महाराज जगनाडे जयंती* 
*श्रीमंत बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवे यांची ३०२ वी जयंती*
(दुर्दैवाने मराठा इतिहासात अनेक महापुरूषांच्या जन्मदिवसाबद्दल एकवाक्यता नाही. श्रीमंत बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवे यांच्या जन्मदिवसाचे अनेक दिनांक महिने व वर्ष दिले आहेत.)

१७४०: दीड वर्षाच्या लढाईनंतर रेवदंड्याचा किल्ला मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून जिंकला.
१९३७: भारतीय पहिली दुमजली बस मुंबईत धावू लागली.
१९५५: युरोप परिषदेने युरोपचा ध्वज अवलंबिला.
१९७१: भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय आरमाराने पाकिस्तानमधील कराची बंदरावर हल्ला केला.
१९८५: सार्क परिषदेची स्थापना.
२०१६: इंडोनेशियातील असेह प्रांतात ६.५ रिश्टर चा भूकंप. यात किमान ९७ लोक मृत्युमुखी.

जन्मदिवस 
१७२१: श्रीमंत बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवे, आधुनिक पुणे नगराचे शिल्पकार.
१८६१: जनरल मोटर्स आणि शेवरलेट चे संस्थापक विलियम सी. दुरंत 
१८७७: नारायण सदाशिव मराठे तथा केवलानंद सरस्वती – महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित, संस्कृतमीमांसाकोशाचे संपादक 
१९००: जागतिक कीर्तीचे नर्तक व नृत्यदिग्दर्शक उदय शंकर 
१९३५: चित्रपट अभिनेते धर्मेंद्र 
१९४४: चित्रपट अभिनेत्री शर्मिला टागोर
१९५१: नोर्थेन अंड शेल चे संस्थापक रिचर्ड डेसमंड

मृत्यूदिन 
१९४७: भाई परमानंद, क्रांतिकारक 
१९७८: इस्रायलच्या ४थ्या तसेच पहिल्या महिला पंतप्रधान गोल्डा मायर, पेशाने शिक्षिका 

*।। दास-वाणी ।।* 

जयाचेनि कृपादृष्टी । 
होये आनंदाची वृष्टी । 
तेणें सुखे सर्व सृष्टी । 
आनंदमये  ।। 

किं तो आनंदाचा जनक । 
सायोज्यमुक्तीचा नायेक । 
कैवल्यपददायक । 
अनाथबंधु  ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : ०७/०१/१२-१३ 

ज्यांची कृपा झाली असता साधकावर 
आत्मानंदाचा वर्षाव होतो. त्यामुळे सर्व सृष्टीच सुखमय आणि आनंदमय असल्याची प्रचीती येते.

जे स्वत:च आत्मानंदाचे जनक आहेत. स्वत: आत्मपदी आरूढ असल्यामुळे साधकाला सर्वोच्च सायोज्यमुक्तीपर्यंत नेऊन सोडतात.शिष्यांना कैवल्यपदावर बसवू शकतात. अशा अनाथांचे बंधु असणाऱ्या श्रीगुरूंना या मंगलाचरणामधे मन:पूर्वक वंदन करतो.

चतुर्दश ब्रह्म दशक , मंगलाचरण समास.

🙏💐💐💐💐💐🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या