Ticker

6/recent/ticker-posts

द्वेषात्मक भाषणाला आळा घाला - सर्व धर्मीयांचे पोलीस अधीक्षकांना साकडे

शेख अजगर शेख अकबर  संपादक मध्य प्रदेश मो.84838 43124

जळगाव :-२४ डिसेंबर रोजी जळगाव शहरात एका संघटनेमार्फत होणाऱ्या कार्यक्रमात कोणत्याही समाजाला अथवा धर्माला अपमानास्पद किंवा धमकी देणारे भाषण जे विशिष्ट गटाच्या विरोधात विशेषता धर्माबाबत पूर्वग्रह दूषित भावनेने व्यक्त करण्यात येते. अशा प्रकारचा कोणत्याही द्वेष जळगावकर सहन करणार नाही व प्रशासनाने सुद्धा अगोदरच योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई करावी.यावरही कोणी द्वेषात्मक भाषण केल्यास त्यांच्यावर त्वरित कडक कायदेशीर कारवाई करावी या मागणी साठी पोलीस अधीक्षक एस राजकुमार यांना सुमित्रा अहिरे यांच्या नेतृत्वातील  एका शिष्टमंडळाने साकडे घातले.

जळगाव शहरात सर्व समाज राष्ट्रीय एकात्मता अंतर्गत गुण्यागोविंदाने राहत असून कोणत्याही प्रकारचा वाद समाजात व धर्मात नसताना बाहेरील कोणी व्यक्तीने येऊन दोन समाजात तेढ निर्माण होईल असे द्वेषात्मक भाषण करू नये असे आवाहन सुद्धा या शिष्टमंडळाने केलेले आहे.

*शिष्टमंडळात यांचा होता समावेश*

 सुमित्रा अहिरे  राज्य सह संयोजक बहुजन क्रांती मोर्चा,खुशाल सोनवणे बहुजन मुक्ती पार्टी जळगाव, सहसचिव, सुनील दहाडे, जलगाव महानगर अध्यक्ष, बहुजन क्रांती मोर्चा, सुनील साळवे बहुजन मुक्ती पार्टी सदस्य, नितीन मोरे, शाकीर शेख राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा महाराष्ट्र उपाध्यक्ष, विजय सुरवाडे बहुजन मुक्ती पार्टी जळगाव महानगर अध्यक्ष, अकील कासार राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा जळगाव तालुकाध्यक्ष, दानिश शेख राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा जळगाव शहर अध्यक्ष
 सय्यद चांद अमीर अध्यक्ष कुल जमाती कौन्सिल, जळगाव, फारुक शेख अध्यक्ष मनियार बिरादरी जळगाव जिल्हा यांची उपस्थिती होती.

फोटो कॅपशन 
पोलीस अधीक्षक एस राजकुमार यांना तक्रार अर्ज सादर करतांना सुमित्रा अहिरे सोबत शिष्ट मंडळ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या