Ticker

6/recent/ticker-posts

मागासवर्गीय शेतकऱ्यांनी सिंचन विहीर योजनेचा लाभ घ्यावा



• जि. प. सदस्या विद्या कुंभरे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324

भंडारा :- सिंचानाअभावी उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट येते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक विकास साधता येत नाही. याकरिता शासनाने अनुसूचित जाती जमातीच्या अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पंचायत समिती च्या कृषी विभागामार्फत सिंचन विहीर योजना आणली आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने मागास वर्गीय शेतकऱ्यांनी सिंचन विहीर योजनेचा लाभ घ्यावा. असे जिल्हा परिषद सदस्या विद्या कुंभरे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. 
         शासनाने अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुरू केली आहे. त्या अंतर्गत नवीन सिंचन विहीर बांधकाम पॅकेज करिता कृषी विभागाच्या योजनांची महाडीबिटी पोर्टलद्वारे अमलबजावणी करावयाची आहे. त्याकरिता http://mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ असून यावर शेतकऱ्यांनी अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरून आवश्यक प्रतिसह प्रस्ताव सादर करावयाचा आहे. जास्तीत जास्त मागास वर्गीय अनुसूचित जाती जमातीच्या अल्प भूधारक शेतकऱ्यांनी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन जिल्हा परिषद सदस्या विद्या कुंभरे यांनी केले आहे.  
*ही आहेत आवश्यक कागदपत्रे(चौकट)*
(१) जमिनीचा गाव नमुना ८अ , सर्व कोरडवाहू गटाचे सात बारे व नकाशा  , (२) सक्षम प्राधिकाऱ्याचे १ लाख ५० हजार रुपयाचे आत उत्पन्नाचे प्रमाणपत्र , (३) सक्षम प्राधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र , (४) सात बारा वर अधिक नाव असल्यास १०० रुपयाचे स्टॅम्प पेपर वर संमती पत्र , (५) अर्जदाराचे आधार कार्ड ची झेरॉक्स , राष्ट्रीयकृत बँक खात्याच्या पहिल्या पानाची झेरॉक्स , बँक खाते आधार लिंक केलेले असावे , (६) ग्रामपंचायत ठरावाची सत्यप्रत व अर्ज ऑनलाईन केल्याची प्रत ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या