Ticker

6/recent/ticker-posts

बिबटाचे शोधार्थ वन कर्मचाऱ्यांनी रात्रीची गस्त वाढविली


• खैरी व पिंडकेपार येथे फटाके फोडले

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324


भंडारा :-लाखनी येथील वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे अंतर्गत सहवनक्षेत्र उमरझरी चे अधीनस्त असलेल्या खैरी येथे बिबटाने १० वर्षीय बालिकेला पंजा मारून जखमी केले. तसेच पिंडकेपार येथे ४ शेळ्या फस्त करून हेमराज पुस्तोडे यांचे गोठ्यात शिरल्याने वन विभागाकडून रेस्क्यू करतांना पिंजऱ्याचे खिडकीतून बिबट पळून गेल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबटाचे शोधार्थ वन कर्मचाऱ्यांनी फटाके फोडून रात्रीची गस्त सुरू केली असल्याचे क्षेत्र सहाय्यक प्रवीण ढोले यांनी सांगितले. 
             उमरझरी सहवनक्षेत्र पुरातन व मोठ्या झाडाचे वनक्षेत्र असल्यामुळे सागवानासारखी बहुमूल्य, फळझाडे व औषधी वनस्पती आहेत. या वनक्षेत्रात तृणभक्षी प्राण्यासह हिंस्त्र प्राण्यांचा अधिवास आहे. सोमवारी सायंकाळी ६:०० वाजताचे दरम्यान रवीना प्रभुदास मरस्कोल्हे(१०) रा. खैरी/वलमाझरी ही घराचे मागील बाजूला काही कामानिमित्त गेली असता शेतशिवारात दबा धरून बसलेल्या बिबटाने हल्ला करून मानेवर पंजा मारून जखमी केले. तिला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे भरती करण्यात आले. तर त्याच दिवशी पिंडकेपार येथील पशुपालक भूमेश्वर नेवारे-२, बुधाजी नेवारे-१ आणि चैतराम लंजे-१ यांच्या ४ शेळ्या फस्त करून बिबट हेमराज पुस्तोडे यांचे गोठ्यात शिरल्याने  गावकऱ्यांनी डांबून वन विभागास माहिती दिली. वन अधिकाऱ्यांनी रेस्क्यूसाठी पिंजरा आणला पण पिंजऱ्याचे खिडकीतून बिबटाने जंगलात धूम ठोकली. २४ तासांत घडलेल्या या घटनांमुळे गावकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  
             वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या सुचनेवरून वनपरिक्षेत्र अधिकारी एस.पी. गोखले यांचे नेतृत्वात क्षेत्र सहाय्यक प्रवीण ढोले, उमरझरी चे बीटरक्षक राणे, वनरक्षक नितीन उशीर, कोदाने, वनमजूर तुपट, वाहन चालक बडगे व हंगामी मजुरांनी रात्री गस्तीत खैरी व पिंडकेपार गाव तसेच गावाबाहेरील क्षेत्रात फटाके फोडण्यात आले. तसेच पिंडकेपार परिसरात बिबटाचे शोधार्थ रात्रीची गस्त वाढविण्यात आली. ज्या कुणास बिबटाची काही माहिती असेल त्यांनी वन विभागास कळवून सहकार्य करावे क्षेत्र सहाय्यक पी.बी. ढोले यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या