Ticker

6/recent/ticker-posts

भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

चित्रा न्युज प्रतिनिधी
जालना :- वडीगोद्री परिसरात धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उभ्या कॅटरनेरला भरधाव कार धडकून भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात लहान मुलीचा देखील समावेश आहे. सदरील कार ही छत्रपती संभाजीनगर मार्गे बीड कडे निघाली होती. मात्र अंकुशनगर सहकारी साखर कारखान्यासमोर उभ्या असलेल्या कंटेनरला या कारने भरधाव वेगाने जोराची धडक दिली. सदर वाहन हे कंटेनर खाली दबले असून वाहन बाहेर काढण्याचे काम हे जेसीपी मशीनच्या साह्याने करण्यात येत आहे. नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या