चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-आज तथागत विद्यालय, केसलवाडा ता.पवनी जि.भंडारा येथे संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी केली गेली. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पद्माकर सावरकर यांनी प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला त्याचप्रमाणे विद्यालयातील विज्ञान शिक्षिका कु. सुषमा गजभिये यांचा वाढदिवस सुद्धा उत्साहात साजरा केला गेला याप्रसंगी शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक श्री. भीमराव वाहाने सर यांनी शाळेच्या प्रगतीसाठी आणि शारीरिक बौद्धिक विकासासाठी 20 लेझीम शाळेला सप्रेम भेट दिले त्यांच्या हस्ते ते स्वीकारण्यात आले व त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे चिखली या गावात ग्रामसफाईसाठी विद्यार्थ्यांच्या हस्ते साफसफाई करण्यात आली. गावाच्या सुरुवातीपासून ते बौद्ध विहारापर्यंत साफसफाई करण्यात आली यासाठी त्या गावच्या सरपंचाकुमा सौ. महंता देशपांडे यांचे खूप सहकार्य लाभले आणि आनंदात आजचा दिवस पार पडला.


0 टिप्पण्या