चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा:- गोपिकाबाई भुरे महिला महाविद्यालय, तुमसर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि रेड रिबन क्लब, तुमसर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिवसानिमित्त महाविद्यालयात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या वतीने महाविद्यालयात मार्गदर्शनपर कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा .डॉ.मुबारक कुरेशी यांनी केले . प्रास्ताविकेच्या माध्यमातून एड्स दिनाचे औचित्य सांगून एचआयव्ही या आजाराप्रती जागरूकता किती आवश्यक आहे असे त्यांनी प्रतिपादित केले. कार्यक्रमाला सुभाष चंद्र बोस शासकीय रुग्णालय , तुमसर येथील कौन्सेलर श्री हेमंत देशमुख प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनातून त्यांनी सांगितले की," एड्स हा हे घातक रोग आहे आणि त्यातून बचाव करणे हे सर्वोत्तम उपाय आहे. कारण हा रोग पूर्णपणे सुधारत नाही. यामुळे टीबी व इतर रोगही होऊ शकतात" .एच आय व्ही एड्स संक्रमणाचे मार्ग व प्रतिबंधात्मक उपाय योजना यासंबंधी त्यांनी सविस्तर माहिती विद्यार्थिनींना दिली .याप्रसंगी महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी सुद्धा एचआयव्ही एड्स वर माहिती दिली . कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्रा. डॉ. कल्पना शिंदे यांनी भूषविले . यानंतर महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी जागतिक एड्स दिनानिमित्त शपथ घेतली की," आम्ही आरोग्यपूर्ण जीवन जगू तसेच समाजाचे एचआयव्ही पासून संरक्षण करू. शिवाय एचआयव्ही सह जगणारी व्यक्तींना मानवाधिकारापासून कधीच वंचित राहू देणार नाही ". जागतिक एड्स आठवड्या निमित्य महाविद्यालयात निबंध व पोस्टर स्पर्धा सुद्धा आयोजण्यात आली होती .निबंध स्पर्धेत कु. शर्वरी पंचबुद्धे हिने प्रथम तर कु.नेहा बीसेन हिने द्वितीय क्रमांक पटकाविले .पोस्टर स्पर्धेत उत्कृष्ट पोस्टर म्हणून कुमारी शर्वरी पंचबुद्धे हिच्या पोस्टरची निवड करण्यात आली .कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.युवराज सेलोकर ,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.मुबारक कुरैशी, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेविका कु.सेजल टेंभरे, कु.प्रिया भोयर ,तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.


0 टिप्पण्या