🌞 दिन विशेष 🌞
इसवी सन २०२३ - २१ डिसेंबर
शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत २०८०
भा. रा. ३० मार्गशीर्ष १९४५
युगाब्द ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : दक्षिणायन
ऋतू : शरद
मास : मार्गशीर्ष
पक्ष : शुक्ल
तिथी : नवमी (०९.४०) ~ दशमी
वार : गुरूवार
नक्षत्र : रेवती (२२.००) ~ अश्विनी
राशी : मीन (२२.००) ~ मेष
१९६५:दादा कोंडके निर्मित व दिग्दर्शित आणि वसंत सबनीस लिखित ’विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाचा पहिला प्रयोग धोबीतलाव येथील रंगभवन येथे झाला.
१९१३:ऑर्थर वेन यांनी लिहिलेले जगातील पहिले शब्दकोडे (Crossword Puzzle) न्यूयॉर्क वर्ल्ड या दैनिकात प्रकाशित झाले.
१९०९:अनंत कान्हेरे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सन यांचा गोळ्या घालून वध केला.
१९०५: स्वातंत्र्यवीर सावरकर बी. ए. ची परिक्षा उत्तीर्ण झाले.
जन्मदिवस :
१९७२: भारतीय पत्रकार आणि मुख्यमंत्री, वाय. एस. जगनमोहन रेड्डी
१९६३:गोविंदा – हिन्दी चित्रपट कलाकार
१९३२: भारतीय लेखक, कवी आणि समीक्षक यू.एन. अनंतमूर्ती
१९०३:भालचंद्र दिगंबर तथा आबासाहेब गरवारे, प्लॅस्टिक व नायलॉन उद्योगाचे जनक, महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील एक प्रमुख शिल्पकार, पद्मभूषण, डि. लिट.
१८९१: श्रमिक आंदोलनाचे सूत्रधार प्रणेता ठाकुर प्यारेलाल सिंह
मृत्यूदिन:
१९९७:निवृत्तीनाथ रावजी पाटील ऊर्फ 'पी.सावळाराम’– भावगीतलेखक .
कुसुमाग्रज यांनी त्यांना ’जनकवी’ ही उपाधी दिली. १९८५ मधे जयसिंगपूर येथे झालेल्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
१९९३: स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार मल्हार रंगनाथ तथा राजाभाऊ कुलकर्णी
१९७९:नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक – चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक
१८२४:जेम्स पार्किन्सन – कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे, हे सिद्ध करणारा शास्त्रज्ञ
*।। दास-वाणी ।।*
मूळमाया गुणांपरती ।
तेथे भूतें कैचीं होतीं ।
ऐसी आशंका हे श्रोतीं ।
घेतली मागां ।।
सूक्ष्मदृष्टीचें कौतुक ।
मूळमाया पंचभूतिक ।
श्रोती विमळ विवेक ।
केला पाहिजे ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : ०८/०४/०५-०७
परब्रह्माच्या ठायी मूळमाया, त्रिगुणांना जन्म दिला म्हणून गुणक्षोभिणी. गुणमायेपासून सत्व रज आणि तमोगुण निर्माण झाले.तमोगुणापासून पंचमहाभूते. या तत्वांचा विस्तार म्हणजे दृष्यसृष्टी होय. मूळमायेत तर त्रिगुण नसतात. तर त्यातील तमोगुणापासून पंचमहाभूते कशी निर्माण होतील अशी शंका मागे घेतली होती.
सूक्ष्मरूपाने अव्यक्तावस्थेमधे मूळमायेमधे पृथ्वी आप तेज वायू आकाश हे समाविष्ट असतातच. हे नवल कळण्यासाठी साधकाने आपली दृष्टी सूक्ष्म करावी. मन स्वच्छ ठेवावे. तरच नित्य अनित्य, सार असार, आत्म अनात्म विवेक जागृत होतो. सृष्टीच्या सृजनाचे गूढ उलगडत जाते.
सूक्ष्मपंचभूते समास.
🙏💐💐💐💐💐🙏


0 टिप्पण्या