Ticker

6/recent/ticker-posts

निलागोंदी येथे महिला शेतकरी मेळावा व पाककृती कार्यशाळा


कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324

भंडारा - आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य प्रोत्साहन अभियान २०२३ चे   औचित्य साधून अफॉर्म पुणे व ग्रामविकास संस्था भंडारा चे संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नीलागोंदी येथे मंगळवारी (ता १९) महिला शेतकरी मेळावा व पाककृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 
       अफॉर्म पुणे व ग्रामविकास संस्था भंडारा चे वतीने महिला शेतकरी मेळावा व पाककृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . उद्द्घाटक सरपंच वर्षा वंजारी, अध्यक्षस्थानी सालेभाटाचे कृषी साहाय्यक निर्मल भोंगाडे , प्रमुख अतिथी उमेदचे प्रभाग समन्वयक आशिष गोंडाने , ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष दिलीप बिसेन, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन बन्सोड, साहाय्यक शिक्षक डी.जी. वंजारी , ग्रामपंचायत सदस्या स्मिता बन्सोड, विद्या हटवार , रोजगार सेवक खुशाल भुरे , प्रकल्प समन्वयक उमेश जांगळे, सोमेश्वर चकोले यांचे प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. 
         क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेला माल्यार्पण करून महिला मेळाव्यास सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. महिला मेळाव्याचे अध्यक्ष निर्मल भोंगाडे यांनी जैविक शेती, तृणधान्य आहार घेऊन आरोग्य सुदृढ ठेवण्याबाबत मार्गदर्शन केले. उमेदचे प्रभाग समन्वयक आशिष गोंडाणे यांनी बचत गट महिलांना तृण धान्यापासून तयार होणारे पदार्थ तयार करून बाजारात विक्री करून आर्थिक उत्पन्न वाढवावे व आहारातून सेवन करावे असे सांगितले . उद्द्घाटक सरपंच वर्षा वंजारी यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले तर ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष दिलीप बीसेन यांनी मिलेट्स ऑफ मंथ म्हणून बाजरी , राजगिरा , सावा , नाचणी , परसोड , ज्वारी , भगर यांचे आहारातील महत्त्व तृणधान्याचे विविध पदार्थ तसेच तृणधान्य प्रक्रिया उद्योग व सेंद्रिय परसबाग याविषयी महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. संचालन व आभार सामाजिक कार्यकर्ता दिलहर बन्सोड यांनी मानले. या महिला शेतकरी मेळावा व पाककृती कार्यशाळेस गावातील महिला शेतकरी व स्वयंसहायता महिला बचत गटातील पदाधिकारी व सदस्य तथा शालेय विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या