Ticker

6/recent/ticker-posts

पिंपळगाव/सडक महसूल मंडळातील धान उत्पादकांना विम्याचा लाभ द्यावा


• माजी जि.प. सदस्य आकाश कोरे यांची मागणी

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324

भंडारा :- खरीप हंगाम २०२३ मध्ये अल्प पर्जन्यवृष्टीने धानाच्या उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट आल्याने शासनाने पिंपळगाव/सडक महसूल मंडळास दुष्काळग्रस्त घोषित केले. या महसूल मंडळातील ज्या धान उत्पादकांनी पीक विमा उतरविला असेल त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यात यावा. अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य आकाश(हेमंत) कोरे यांनी केली आहे. 
              पिंपळगाव/सडक महसूल मंडळात ५ तलाठी साझ्यात रेंगेपार/कोहळी, चिचटोला, खैरी, सामेवाडा, पिंपळगाव/सडक, मोरगाव, निलागोंदी, राजेगाव, केसलवाडा/पवार, परसोडी, सिंदीपार, मुंडीपार, खुर्शीपार, सालेभाटा, मासलमेटा, बोरगाव, लाखोरी, आलेसुर, येटेवाही, शींगोरी इत्यादी २२ गावांचा समावेश होतो. त्यापैकी २० गावे लोक वस्तीची तर २ गावे रीठी आहेत. या महसूल मंडळात खरीप हंगामातील मुख्य पीक धान असून जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत सरासरी पेक्षा कमी पर्जन्यवृष्टी झाल्याने शासनाकडून दुष्काळ घोषित करण्यात आल्याचा ९ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे बैठकीत निर्णय घेण्यात आला. असे माजी जिल्हा परिषद आकाश(हेमंत) कोरे यांचे म्हणणे आहे. 
             धान पिकासाठी शेतकरी वित्तीय संस्थांतून बि-बियाणे, रासायनिक खते, मजुरी, कीटकनाशक च्या व्यवस्थेकरिता पीक कर्ज घेतो. पण खरीप हंगाम २०२३ मध्ये कमी पर्जन्यवृष्टीने धानाचे उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट आल्याने शासनाने पिंपळगाव/सडक महसूल मंडळात दुष्काळ घोषित केला आहे. त्यामुळे या महसूल मंडळात पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून इतर सवलती बरोबरच पीक विम्याचा लाभ देण्यात यावा. अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य आकश(हेमंत) कोरे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या