🌞 दिन विशेष 🌞
इसवी सन २०२३ - २० डिसेंबर
शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत २०८०
भा. रा. २९ मार्गशीर्ष १९४५
युगाब्द ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : दक्षिणायन
ऋतू : शरद
मास : मार्गशीर्ष
पक्ष : शुक्ल
तिथी : अष्टमी (११.१५) ~ नवमी
वार : बुधवार
नक्षत्र : उत्तरभाद्रपदा (२३.००) ~ रेवती
राशी : मीन
*दुर्गाष्टमी*
बुधाष्टमी
*संत गाडगे बाबा पुण्यस्मरण*
महाराणी ताराराणी पुण्यतिथी, कोल्हापूर.
जागतिक मानवी ऐक्यभाव दिन
१९९९:पोर्तुगालने ’मकाऊ’ हे बेट चीनला परत दिले.
१९९३: भारत आणि सोवियत संघात ब्रुसेल्स येथे सहकार करार झाला.
१९८८: लोकसभेत मतदानाचे वय वर्ष २१ वरून १८ करण्यासाठी विधेयक मंजूर.
१९८५: तिरुपती बालाजी येथील भगवान वेंकटेश्वराच्या मूर्तीला २.५ कोटी रुपयांचे मुकुट चढविले.
१९४६: महात्मा गांधी एक महिन्यासाठी श्रीरामपूर येथे मुक्कामाला होते.
१९४५:मुंबई - बंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू
१९४२:दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी कलकत्ता शहरावर बॉम्बवर्षाव केला.
१९२४:हिटलरची लँड्सबर्ग तुरुंगातून सुटका.
१८७६: राष्ट्रगीत वंदे मातरम चे लिखाण बकिमचंद्र चटर्जी यांनी पूर्ण केले.
जन्मदिवस :
१९४२:राणा भगवानदास – पाकिस्तानातील पहिले ’हिन्दू’ मुख्य न्यायाधीश
१९४०:यामिनी कृष्णमूर्ती – भरतनाट्यम व कथ्थक नर्तिका, पद्मश्री
१९२७: मध्य प्रदेश चे पूर्व मुख्यमंत्री मोतीलाल वोरा
१८६८:हार्वे फायरस्टोन – अमेरिकन उद्योजक, फायरस्टोन टायर आणि रबर कंपनीचे संस्थापक
मृत्यूदिन:
२०१०: चित्रपट दिग्दर्शक बाबूभाई मिस्त्री.
२०१०:नलिनी जयवंत – अभिनेत्री
२०१०:सुभाष भेंडे – लेखक
१९९८: जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी बंगळुरू वेंकट तथा बी. व्ही. रमण
१९९६: कार्ल सगन – अमेरिकन अंतराळतज्ञ, लेखक व विज्ञानप्रसारक. यांनी सुमारे ६०० हून अधिक शोध निबंध प्रकाशित केले. शुक्राच्या पृष्ठभागावरील उच्च तापानाचा शोध त्यांच्या प्रयत्नामुळे लागला.
१९९६:दगडू मारुती तथा ’दया’ पवार – ’बलुतं’कार दलित लेखक
१९९३: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार वामन नारायण तथा डब्ल्यू. एन. भट
१९७१: द वॉल्ट डिस्ने कंपनीचे सहसंस्थापक रॉय ओ. डिस्ने
१९५६:देबुजी झिंगराजी जानोरकर तथा ’संत गाडगे महाराज’ – कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष सेवेचे व्रत घेतले आणि त्यासाठी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले.
१९३३:विष्णू वामन बापट – संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक, शंकराचार्यांच्या ग्रंथांचे व इतर संस्कृत ग्रंथांचे मराठीत अनुवाद केले.
१७३१:छत्रसाल बुंदेला – बुंदेलखंडचे महाराजा
*।। दास-वाणी ।।*
त्या मूळपुरूषाची वोळखण ।
ते मूळमायाचि आपण ।
सकळ काही कर्तेपण ।
तेथेंचि आले ।।
देवापासून सकळ जालें ।
हें सर्वांस मानलें ।
परी त्या देवास वोळखिलें ।
पाहिजे कीं ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : ०८/०३/१४-१६
परब्रह्माच्या ठायी जे ' एकोहं ' हे स्फुरण होते, ती स्फुरणरूप मूळमायाच ईश्वरी स्वरूप आहे. संपूर्ण विश्वाची निर्मिती हे ईश्वराचेच कर्तृत्व आहे. कोणतेही कार्य, त्याचे कारण आणि कर्तृत्व यांचे मूळ प्रकृती म्हणजे मूळमायाच आहे.
सर्व विश्व आणि ब्रह्मांडे ही ईश्वरानेच निर्मिली आहेत हया विषयी कोणाच्याही मनात आशंका नाही. परंतू त्या ईश्वराचे मूळ स्वरूप जाणून घेणे ह्यातच जीवनाचे सार्थक आहे हे मात्र बहुतांश लोकाना समजत नाही. त्या दृष्टीने प्रयत्नही हजारोंमधे एखादाच करताना दिसतो.
सूक्ष्मआशंकानिरूपण समास.
🙏💐💐💐💐💐🙏


0 टिप्पण्या