विजय चौडेकर जिल्हा प्रतिनिधी नांदेड 9529944770
नांदेड :- अंगणवाडी सेविका आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी बेमुदत संप पुकारला दिड महिना होत आहे, तरी संप मिटला जात नाही, प्रशासन गांभीर्याने विचार करत नाही असे दिसते, लहान बालकांचे आतोनात नुकसान होत आहे, शारीरिक व शैक्षणिक नुकसान होत आहे,जसे अंगणवाडी बंद झाल्याने लहान बालकांना जी शाळेत जाण्याची सवय लागली होती, शिक्षणाची ओढ लागली होती ती शिस्त बिघडली असेल च कारण या वयात जे संस्कार घडतात ते पुढें चालुन जीवन सुधारत जातात आणि विशेष बाब त्यांना जे पौष्टिक आहार नियमित मिळत होता म्हणजे गरिब बालकांना कुपोषण होणार नाही त्यासाठी, ते बंद झाला कुपोषणाचे प्रमाण वाढणार यात शंका नाही,, आणि,स्तनदा माता व एक ते तीन वर्षांची बालके यांचाही पोष्टीक आहार बंद झाल्याने, कुपोषण होण्याची शक्यता जास्त आहे,ईथे या बाबीला अंगणवाडी सेविका जवाबदार का।, प्रशासन जबाबदार आहे,,हे कोण ठरवणार, प्रशासनाने जे काही निर्णय आहे ते लवकर विचार करावा, प्रशासन म्हणते मी माझ्या जागी बरोबर आहे, अंगणवाडी सेविका म्हणतात आम्ही आमच्या जागी बरोबर आहोत,,तर मग चुकतंय कोणाचं,हा मोठा प्रश्न आहे, अंगणवाडी,बालवाडी, मध्ये शिकणाऱ्या बालकांच्या पालकांना पडला आहे,,संप आणखी जास्त दिवस राहिला तर लहान मुलांची शिस्त बिघडली जाईल आणखी नव्याने शाळेतली ओढ निर्माण करावी लागेल शिस्त लागायला वेळ लागेल,,एवढी ताना तान करण्यापेक्षा काय ते निर्णय घेऊन मोकळे व्हावे,संप कोणत्याही प्रकारचा, कोणत्याही मागण्यांचा असो आखीर नुकसान तर जनतेचच असणार आहे,,
0 टिप्पण्या