Ticker

6/recent/ticker-posts

ग्राहक सेवा संस्था (रजि)CONSUMER AWARENESS COMMITTE (REGD)नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती...!

सोनू क्षेत्रे जिल्हा प्रतिनिधी 
ठाणे मो.9834081563

ठाणे- ग्राहक सेवा संस्था (रजि) संस्थापक अध्यक्ष  गितेंद्र मिर्लेकरसर यांच्या निर्देशानुसार,
   काल शनिवार, दि. २० जानेवारी २०२४ रोजी विरार येथे आयोजित केलेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात ग्राहक सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  गितेंद्र मिर्लेकरसर यांनी आपल्या ग्राहक सेवा संस्थाचा मुंबई मध्ये विस्तार करत मुंबई साठी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली.  ह्या छोटेखानी कार्यक्रमात स्वतः ग्राहक सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  गितेंद्र मिर्लेकरसर, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष  शिवाजी कल्याणकर, प्रदेश प्रतिनिधी संतोष भालेकर व  सुरेश कांबळी आणि युवा अध्यक्षा कु. सायली मिर्लेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.  सविताताई तावरे यांची ग्राहक सेवा संस्था मुंबई जिल्हा महिला अध्यक्षा तर  समीर नाईक यांची मुंबई जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. सविताताई चाकणे व  मालतेशसर हेब्बारे यांची अनुक्रमे मुंबई महिला उपाध्यक्षा आणि मुंबई उपाध्यक्ष म्हणून याच  कार्यक्रमात नियुक्ती करण्यात आली. तसेच विरार मध्ये स्थाईक असणाऱ्या सौ. सुरेखाताई कोकरे यांची पालघर महिला जिल्हा उपाध्यक्ष, वैशाली कांबळे यांची मुंबई महिला उपाध्यक्षा तर नंदा डेरे यांची नवी मुंबई महिला अध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली.
    सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना ह्या कार्यक्रमात ओळखपत्र वितरीत करण्यात येऊन सर्वाचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. संस्थापक अध्यक्ष श्री मिर्लेकर सरांनी संस्थेचे कार्य,  उद्दीष्टे विशद करत ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण कसे करावे ह्या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.  अल्पोपाहारा नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या