Ticker

6/recent/ticker-posts

एस.टी. च्या चाकाखाली येवुन इसमाच्या अपघाती मृत्यू


   

सचिन चौरसिया तालुका प्रतिनिधी रामटेक मो. नं.9730901120
 
रामटेक :- दिनांक ८ फेब्रुवारी रोज गुरुवारला सकाळी ०९:३० दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या एस.टी. चा धक्का लागल्याने व एस.टी. चे चाक डोक्यावरून गेल्याने इसमाचा जागेवरच मृत्यु झाल्याची घटना हिवरा बाजार - रामटेक मार्गावरील पिन्डकापार ( सोनपुर ) गावाजवळ घडली.
                पोलीस स्टेशन रामटेक येथुन मिळालेल्या माहितीनुसार रमेश बकाराम पानसे वय ५८ वर्ष रा. पिंडकापार असे मृतकाचे नाव आहे. तो त्याच्या पायाच्या उपचारा करीता रामटेक येथे जात असताना बस क्र. एम एच ४० एन ८५७८ चा चालक प्रीतमसिंग सदाशिव उके वय ५१ वर्ष रा. कांद्री ता. पारशीवणी याने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने निष्काळजीपणे चालविल्याने मृतकास धक्का लागला व मृतकाच्या डोक्यावरून बसचा मागचा चाक जाऊन त्याचा जागीच मृत्यु झाला. फिर्यादी महेश रमेश पानसे वय २३ वर्ष रा.पिंडकेपार याच्या तोंडी रिपोर्टवरून पोस्ट रामटेक येथे अप क्रमांक ९८/२०२४० कलम २७९ ,३३८, ३०४(अ) भा. द.वी. अनवे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपासणी पो.उप. निरीक्षक कार्तिक सोनटक्के हे पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनात करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या