हर्षवर्धन देशभ्रतार विशेष प्रतिनिधी चित्रा न्युज महा.
नाशिक :-योगाच्या प्रचार, प्रसारासाठी कटिबद्ध असलेल्या महाराष्ट्र योगशिक्षक संघ नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने यांच्या वतीने व संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.मनोज निलपवार यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्रात योग आयोग स्थापन झाला पाहिजे यासह व इतर मागण्यांसाठी नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनासोबत योग शिक्षक संघाचे बारा सूत्री मागणी पत्र व हरियाणा योग आयोग अॅक्ट आणि महायोगोत्सव नागपूर 2023 येथे योग आयोगाबाबत करण्यात आलेला ठरावाची प्रत जोडण्यात आली आहे.
सर्व योगशिक्षक सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून राज्यात योगाचा प्रसार करण्यासाठी व समाज स्वास्थ्यासाठी पदरमोड करून झटत आहेत, परंतु त्यांच्या मागण्यांकडे शासनस्तरावरून दुर्लक्ष होत आहे. देशातील राजस्थान, गुजरात व हरियाणा राज्यांमध्ये योग आयोग स्थापन झाला असून कार्यवाही सुरु आहे. परंतु महाराष्ट्र हे योगमध्ये अग्रेसर राज्य असूनही योग आयोग स्थापन करण्यासह संघाने केलेल्या इतर न्याय मागण्यांबाबत कार्यवाही करण्यात दिरंगाई होत आहे, त्या अनुषंगाने हे निवेदन देण्यात आले.
निवेदनात योगशिक्षक संघाने केलेल्या प्रमुख मागण्या
महाराष्ट्रात योग आयोग स्थापन करावा, एमपीएससी परीक्षेत योग विषयाला ऐच्छिक विषय म्हणून मान्यता द्यावी, शाळा व महाविद्यालयात योग विषयास प्रमुख विषय म्हणून मान्यता द्यावी, ग्रामीण आणि शहरी भागात २० वर्षांपासून निशुल्क सेवा देणाऱ्या योगशिक्षकास लोक कलवंतांप्रमाणे मानधन देण्यात यावे, योग विषयात सेट परीक्षेत सामील करावे, योगशास्रात पदवीधर व उच्चशिक्षित योगशिक्षकांची नोंदणी करून त्यांना नोंदणी क्रमांक द्यावा, मराठी साहित्य संमेलनाप्रमाणे दरवर्षी योगसंमेलन आयोजित करावे त्यासाठी योगशिक्षक संघास अनुदान द्यावे, महाराष्ट्र पोलीस खात्यात योगशिक्षक नियमित करावा, आरोग्यवर्धिनी केंद्रात सेवा देणारे योगशिक्षक यांना नियमित करावे, शासकीय व अशासकीय आस्थापनामध्ये योगा ब्रेक नियमित करावा व त्या ठिकाणी एक तज्ञ योगशिक्षक नेमवा आदीसह इतर मागण्यां नमूद करण्यात आल्या आहेत.
याप्रसंगी महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे राज्य कोषाध्यक्ष श्री प्रसाद कुलकर्णी, उत्तर महाराष्ट्र प्रमुख उत्तमराव अहिरे, जिल्हाध्यक्ष जिवराम गावले, राज्य ग्रामीण प्रकोष्ठ डॉ. तस्मिना शेख, जिल्हा महासचिव गीता कुलकर्णी, सोशल मिडिया प्रभारी व प्रसिद्धीप्रमुख विश्वजित सावंत, डॉ. अंजली भालेराव, मेघा भावसार , भारती सोनवणे, योगिता शिलारकर, शिवानी देशपांडे, जयश्री भामरे, अश्विनी येवला, कल्पना पवार आदीसह योगशिक्षक उपस्थित होते.


0 टिप्पण्या