Ticker

6/recent/ticker-posts

काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील असमाधानी पदाधिकारी ‘वंचित’ च्या संपर्कात !

माजी कॅबिनेट मंत्र्याचाही समावेश !

चित्रा न्युज प्रतिनिधी 

मुंबई: शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपमधील अनेक असमाधानी पदाधिकारी आणि नेते वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात आहेत. या नेत्यांमध्ये माजी कॅबिनेट मंत्र्याचा समावेश असून या महिन्याच्या अखेरीस हे नेते वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील होणार आहेत.आम्ही 26 फेब्रुवारीनंतर पुढील कार्यवाही सुरू करणार आहोत. एकदा त्यांची सामील होण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, त्यांना योग्य पदांवर घेण्याचा विचार केला जाणार असल्याची माहिती वंचितच्या उपाध्यक्षांपैकी एकाने दिली आहे.

या वर्षाच्या सुरुवातीपासूनच, INC, NCP, SS, BSP, AIMIM मधील अनेक स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी वंचितमध्ये प्रवेश केला आहे.

वंचितच्या उपाध्यक्ष्यांनी सांगितल्यानुसार, वंचितमध्ये सामील होण्याचे हे प्रमाण बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढत्या लोकप्रियतेची आणि त्यांना मिळणाऱ्या पाठिंब्याची साक्ष आहे.

वंचितमध्ये प्रवेश करण्यासाठी बरेचजण उत्सुक असून,त्यांची नावे योग्य वेळी जाहीर केली जातील, असेही त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या