Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय स्त्रीवर रमाई चे अनंत उपकार आहेत


महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष पुष्पा डुंभरे यांचे प्रतिपादन 

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी मो. 95459 14324

भंडारा :- दिनदुःखितांची माय माउली मातोश्री रमाई ने अनेक हाल अपेष्टा सहन करून बाबासाहेबांच्या शैक्षणिक वा सामाजिक कार्यात कसलाही अडथळा निर्माण केला नाही. स्वतः चे गळ्यातील सोन्याचे दागिने विकून वसतिगृहातील मुलांना जेवण दिले. तिच्या त्यागामुळेच आजची आधुनिक स्त्री सन्मानाचे जीवन जगत असल्यामुळे भारतीय स्त्रीवर रमाई चे अनंत उपकार आहेत. असे काँग्रेस महिला आघाडीच्या लाखनी तालुकाध्यक्ष पुष्पा डुंभरे यांनी मातोश्री रमाई जयंती निमित्त बस स्थानक लाखनी येथे आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करतांना आपले विचार व्यक्त केले. 
             मातोश्री रमाई जयंती उत्सवाचे औचित्य साधून भीमरत्न मित्र मंडळ लाखनी-मुरमाडी-सावरी तर्फे बस स्थानक लाखनी येथेबुधवार(ता.७) अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महिला काँग्रेस कमिटी लाखनी च्या तालुकाध्यक्ष पुष्पा डुंभरे, प्रमुख अतिथी मध्यवर्ती बस स्थानक लाखनी चे वाहतूक नियंत्रक श्याम गिरेपुंजे, सामाजिक कार्यकर्ता रत्नदीप हुमने, शुभम श्यामकुवर, वंदना पडोळे, दिपाली चोले, मंगला गायधने, रेखा भैसारे यांचे प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. अभिवादन सभेची सुरुवात माता रमाई च्या प्रतिमेला माल्यार्पण तथा दिप प्रज्वलनाने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी माता रमाई चे जीवनावर प्रकाश टाकला. मातोश्री रमाई च्या त्यागामुळेच आम्ही सुखाने जीवन यापण करीत आहोत. त्यांनी आपल्या लेकरांना डोळ्यादेखत मृत्यूचे दाढेत जातांना पाहिले. पण समाजाच्या उत्थानासाठी अहोरात्र धडपडणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कसलाही त्रास दिला नाही. त्या स्वतः चंदनापरी झिजून सर्वांना मायेची ऊब दिली. असे गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ता रोशन खोब्रागडे तर आभार पियूष वाहने यांनी मानले. अभिवादन सभेच्या यशस्वीतेसाठी भीमरत्न मंडळाचे पदाधिकारी अभिषेक मेश्राम, सागर लोखंडे, राऊत यांनी अथक परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या