किरण जावळे कार्य संपादक चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य मो.7517033838
बीड-शहरापासून जवळच असलेल्या अतिशय निसर्गरम्य परिसरात असलेल्या शिक्षणतीर्थ संस्कृती विद्यालय म्हसोबा फाटा नगर रोड, बीड या शाळेला खाजगी व्यवस्थापन *मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा* उपक्रमांतर्गत तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक मिळाला आहे . ही शाळा मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवून शारीरिक, मानसिक, बौद्धिक , सामाजिक, व अध्यात्मिक उपक्रमावर भर देते. यामध्ये वर्ग सजावट, शाळा सजावट, वृक्षारोपण, संरक्षण भिंतीची रंगरंगोटी, बोलक्या भिंती तसेच शाळेत विद्यार्थी मंत्रिमंडळ बालसंसद आहे. शाळेत परसबाग आहे. आरोग्यदायी वृक्षांची लागवड शाळेच्या परिसरात केलेली आहे . 'मेरा देश, मेरी मिठ्ठी ' याही उपक्रमाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे . शाळेच्या उपस्थितीचे प्रमाण शंभर टक्यावर आहे. महावाचन चळवळीमध्ये मुलांनी सहभाग घेतला आहे . विविध प्रकारच्या स्पर्धात मुलांचा सहभाग असतो. शालेय परिसरात जनजागृतीचे फलक लावण्यात आले आहेत . वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येते. शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे पंचसूत्री पद्धतीने एक धडा पाच वेळेस शिकवला जातो . शाळेत मनोरंजनासाठी कारंजे, पशुपक्षालय आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांचा शाळांमधील शिक्षक , पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळाप्रती उत्तरदायीत्वाची भावना निर्माण निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे. यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आदर्श शाळा योजनेअंतर्गत ' मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा ' हे अभियान राबविण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा यांच्यासाठी व इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना स्वतंत्रपणे परितोषीकांची तरतुद करण्यात आली आहे. तालुकास्तरीय , जिल्हास्तरीय , विभागास्तरीय, राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. राज्याच्या शिक्षण विभागाने केंद्रातून तालुका , जिल्हा आणि राज्यस्तरावर ' ' सुंदर शाळेची ' स्पर्धा आयोजित केली होती. या शाळेचा परिसर मोठा असल्याने येथे विविध उपक्रम राबविणे शिक्षक व विद्यार्थ्यांना शक्य होते. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावल्याने संस्कृती विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्री दत्ता नलावडे यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.


0 टिप्पण्या