किरण जावळे कार्य संपादक चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य मो.7517033838
बीड-जिल्ह्यासह ग्रामीण भागात मार्चचा शेवटचा आठवडा संपत आलेला असतानाच पाणीटंचाईच्या झळा जानवू लागलेल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्यांची समस्या निर्माण होणार असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून त्वरित उपाययोजना करण्याचा आदेश आपल्या स्तरावर सर्व अधिकारी कर्मचारी विशेष: तलाठी, मंडळाधिकारी, ग्रामसेवकांना द्याव्यात अशी सूचना शिव संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी तथा ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटील यांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना दिल्या.
ग्रामीण भागातील खाजगी मालकीचा उपलब्ध पाणीसाठा असल्यास विहिरी व हातपंप अधिग्रहण करून पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता उपाययोजना कराव्यात तसेच दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास चाऱ्याचाही प्रश्न गंभीर निर्माण होऊ शकतो यासाठी चाऱ्याची व्यवस्था शेतकऱ्याच्या दावणीला करण्याची प्रस्ताव शासनाला पाठवावा जेणेकरून शेतकऱ्यांच्या पशुधनाचा चारा व पाण्याची व्यवस्था होऊ शकेल. कोणत्याही अधिकाऱ्याने निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण न सांगता ग्रामीण भागातील माणसे व जनावरे सांभाळण्याचे काम करावे असेही आदेश समाजसेवक सुरेश पाटील यांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना दिले.


0 टिप्पण्या