संजीव भांबोरे भंडारा
भंडारा :-
येथील रॉयल राजा हॉटेल या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचचा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला .याप्रसंगी अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे होते .तर प्रमुख अतिथी वंचित बहुजन आघाडी भंडारा गोंदिया जिल्ह्याचे उमेदवार संजय केवट,भंडारा जिल्हा अध्यक्ष धनपाल गडपायले,भंडारा महिला अध्यक्ष तनुजा नागदेवे ,भंडारा गोंदिया जिल्हा निरीक्षक सुनिता टेंभुर्ण, भंडारा जिल्हा युवा अध्यक्ष दीपक जनबंधू इत्यादी मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला .भंडारा जिल्ह्याचे उमेदवार संजय केवट यांनी सांगितले की आपणच कित्येक वर्षापासून सामाजिक काम करत आहोत .विविध गरिबांच्या समस्या आपल्याला माहित आहे .डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सर्व वंचित घटकांना न्याय मिळवून दिलेला आहे .फुले ,शाहू ,आंबेडकर विचारधारा हे आमच्या घरामधूनच मी शिकलेला आहे .माझे वडील बाबासाहेब आंबेडकरांचे पाईक आहेत. आणि मी बाबासाहेबांच्या आदर्श घेऊन आम्ही लहानपणापासून घडलो .त्यामुळे वंचितांच्या उद्धाराकरिता आपण सजग आहोत प्रयत्नशील आहोत आणि ऍड बाळासाहेब आंबेडकरांनी मला उमेदवारी दिली .मला निवडून दिले तर खरंच वंचित घटकासाठी मी लढण्याचा प्रयत्न करीन व न्याय मिळवून देईल असे मत वंचित बहुजन आघाडीचे भंडारा गोंदिया जिल्ह्याचे उमेदवार संजय केवट यांनी व्यक्त केले .
त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सर्वजीत बनसोडे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. भिकाऱ्यासारखे आम्हाला ३ सीटा देतात , एडवोकेट बाळासाहेब आंबेडकरांना व त्यांच्या पक्षांना नेस्तनाभूत करण्याचा डाव महाविकास आगामी रचलेला आहे. त्यामुळे . वंचित चे उमेदवार निवडून जाऊ नये ,हे संसदेत पोहोचू नये ,हा त्यांच्या अट्टाहास आहे .त्यामुळे आमच्या सोबत सन्मानाने बसत नाही व सन्मानाने आम्हाला विचारात घेत नाही. पडक्या दोन तीन शिट्या देतात व ते कोणत्या तेही सांगत नाही .त्यामुळे आम्हाला बाहेर पडावं लागलं .आम्ही आज स्वबळावर आपले उमेदवारउभे केलें आहेत. आपल्या भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या उमेदवार संजय केवट यांना
जी उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यांना ताकतीने परिश्रमाने निवडून द्यावे असे मत सर्वजित बनसोडे यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे महिला जिल्हाध्यक्ष तनुजा नागदेवे, सुनीता टेंभुर्ण, धनपाल गडपायले,दीपक जनबंधू यांचे मार्गदर्शन झाले. प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष सुरेश खंगार यांनी केले .तर संचालन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक डी जी रंगारी यांनी केले . आभार ग्यांनचंद जांभुळकर यांनी मानले.
याप्रसंगी भंडारा जिल्ह्यातील सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी तालुका अधिकारी शहर पदाधिकारी उपस्थित होते.


0 टिप्पण्या