Ticker

6/recent/ticker-posts

बावणे कुणबी समाजसेवा मंडळ भंडारा तर्फे तुकाराम बीज कार्यक्रम..


      

संजीव भांबोरे भंडारा 
भंडारा :  बावणे कुणबी समाज सेवा मंडळ भंडारा तर्फे तुकाराम बीज चा कार्यक्रम घेण्यात आला .प्रथम पाहुण्यांच्या हस्ते जगद्गुरु श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज आणि वीर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण  व दीप प्रज्वलन करण्यात आले . नंतर अध्यक्ष सन्माननीय गोपाल सेलोकर तसेच प्रमुख अतिथी प्रदीप कडव हे होते . यांचे शब्दसुमनाने स्वागत करण्यात आले .त्यानंतर संत तुकाराम महाराज यांच्या जीवन प्रवासावर सर्वांची मार्गदर्शन पर भाषणे झालीत. संत तुकाराम महाराजांनी सामाजिक ,नैसर्गिक ,अध्यात्मिक, वैचारिक प्रबोधन करून लोकांना जागृत करण्याचे कार्य केले .त्यांचे अभंग आजही त्यांना जीवित ठेवण्याचे कार्य करीत आहे . हे अमूल्य कार्य जगासाठी फारच मोलाचे ठरलेले आहे. त्यांच्या एकेका अभंगातून वास्तविकता दर्शविलेली आहे. मुख्य कार्यकारीणी उपाध्यक्ष मंगला डहाके, उपाध्यक्ष शंकरराव निंबार्ते , मुख्य कार्यकारीणीचे अध्यक्ष श्रीयुत सदानंदजी ईलमे यांची तुकाराम महाराजांवर भाषणे झाली. पुनम डहाके यांनी तुकाराम महाराजांचे एक गीत गायन केलं .मीरा टिचकुले यांनी एक भजन गायन केले .प्रमुख अतिथी प्रदीप कडव यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी अध्यक्षीय भाषण झाले.

 वामनराव गोंधुळे यांनी आभार व्यक्त करीत विज्ञानाची कास धरून सुंदर मनोगत व्यक्त केले. संचलन अंजली बांते यांनी केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या