Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी.

राकेश आसोले कार्यलय प्रतिनिधी चित्रा न्युज ठाणे 

छत्रपती संभाजीनगर :-मध्ये मराठा समजाच्या समन्वयकांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीत राडा झाल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीदरम्यान दोन गटांत हाणामारी झाली आहे. या बैठकीत बाहेरचे लोक आल्याचे म्हटले जात आहे. दोन गटांत ही मारामरी झाल्यांतर ही बैठक आता तात्पुरती थांबवण्यात आली आहे.

संभाजीनगरच्या बैठकीत नेमकं काय झालं?

संभाजीनगरमध्ये मराठा समाजाची समन्वय बैठक होती. संभाजीनगर लोकसभेतून मराठा समाजाचा एक उमेदवार देण्यासाठी बैठक आयोजित केली होती. जळगाव रोड वरील मराठा मंदिर सभागृहात ही बैठक नियोजित होती. या बैठकीसाठी मराठा बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. केवळ पुरुषच नव्हे तर महिला आंदोलकही एकमेकींना भिडल्या.  
एकमताने उमेदवार ठरवण्यासाठी बोलावली होती बैठक
लोकसभा निवडणुकीसाठी एक उमेदवार ठरवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र तिथे एकमत झालंच नाही. ही बैठक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. सध्या येथे तणावाची स्थिती आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या