• सामेवाडा-पिंपळगाव मार्गावरील घटना
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- ८५ वर्षे व त्यावरील वयोगटातील मतदारांना पोस्टल मतदानाची सुविधा उपलब्ध केल्यामुळे मतदान अधिकारी वयोवृद्धांचे पोस्टल मतदान गोळा करण्याकरिता जात असताना दुचाकीला वाचविण्याचे प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून वाहन रस्त्याखाली उतरले. पण सुदैवाने कोणी जखमी झाला नाही. अथवा जीवितहानी झाली नसल्याची घटना सामेवाडा ते पिंपळगाव रस्त्यावर रविवारी(ता.७) दुपारचे सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे निवडणूक कर्तव्य बजावणाऱ्या मतदान अधिकाऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून ११ भंडारागोंदिया लोकसभा निर्वाचन क्षेत्रात प्रथम टप्प्यात निवडणूक असून मतदान १९ एप्रिल रोजी होणार आहे. निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी. या करिता निवडणूक आयोग विविध उपाययोजना करीत आहे. ८५ वर्षे व त्यावरील वयोगटातील व्यक्ती मतदानापासून वंचित राहू नये. या करिता त्यांना पोस्टल मतदानाची सोय करण्यात आली आहे. संबंधित निवडणूक अधिकाऱ्यामार्फत हे पोस्टल मतदान गोळा करण्याचे काम सुरू आहे. केंद्राध्यक्ष प्रेमलाल गावकर, मतदान अधिकारी के. वाय. निमजे, सूक्ष्म निरीक्षक एस.एस. लांजेवार, व्हिडीओ ग्राफर राहांगडाले, पोलिस शिपाई क्रांतीश कराडे, वाहन चालक हेमराज राऊत हे पथक क्रमांक ७ चे पथक वाहन क्रमांक एमएच ३६ डब्ल्यू ६६४० ने वयोवृध्द मतदारांचे घरी जाऊन पोस्टल मत प्रक्रिया पूर्ण करीत होते. ७ मतदारांकडून प्रक्रिया पूर्ण करून सामेवाडा वरून पिंपळगाव/सडक कडे जात असताना दुचाकीला वाचविण्याचे प्रयत्नात चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले व चारचाकी रस्त्याखाली उतरली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. या बाबद वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आली. काही वेळाने दुसरे वाहन बोलावून उर्वरित मतदारांचे पोस्टल मतदान गोळा करण्यात आले. अचानक घडलेल्या या प्रकाराने मतदान अधिकाऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
0 टिप्पण्या