• काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष कैलास भगत यांचा आरोप
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- महायुतीचे भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातील स्टार प्रचारक खासदार प्रफुल पटेल यांना भाजपा उमेदवाराचा पराभव दिसू लागल्यामुळे बेताल वक्तव्य सुरू करून काँग्रेस व्होट बँकेत सेंधमारी चा प्रयत्न चालविला आहे. नुकत्याच लाखनी येथे झालेल्या भाजपा उमेदवाराचे प्रचार सभेत आमची लढत काँगेस विरुद्ध नसून अपक्ष सेवक वाघाये विरुद्ध असल्याचे बेताल वक्तव्य केले असल्याचा आरोप काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष कैलास(रणवीर) भगत यांनी केला असून त्यांनी पासष्टी ओलांडल्यामुळे त्यांची वारंवार जीभ घसरत असल्याचे सांगितले.
निवडणूक आयोगाने ११ भंडारा-गोंदिया लोकसभा निर्वाचन क्षेत्राची प्रथम टप्प्यात निवडणूक जाहीर केल्यामुळे मतदान १९ एप्रिल रोजी होणार आहे. महायुती कडून भारतीय जनता पार्टीचे सुनील बाबुराव मेंढे तर महाविकास आघाडीकडून काँग्रेचे डॉ. प्रशांत यादवराव पडोळे यांचेसह वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी व अपक्ष असे एकूण १८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रचार शिगेला पोहचला असून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. नुकतीच महायुती उमेदवाराची प्रचार सभा लाखनी ला खासदार प्रफुल्ल पटेल, उमेदवार सुनील मेंढे, डॉ. परिणय फुके, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नाना पंचबुद्धे, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, धनंजय दलाल, माजी आमदार बाळा काशीवार, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे, माजी जिल्हाध्यक्ष शिवराव गिरेपुंजे, जिल्हा परिषद सदस्य अविनाश ब्राह्मणकर, यशवंत सोनकुसरे व महायुती पदाधिकाऱ्यांचे प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. त्यात खासदार प्रफुल पटेल यांनी महायुती च्या उमेदवाराची लढत काँग्रेस च्या विरोधात नाही तर अपक्ष उमेदवार सेवक वाघाये यांचे विरुद्ध आहे. ते अपक्ष असले तरी भाजपा उमेदवाराला टक्कर देण्याची क्षमता त्यांच्यात आहे. असे बेताल वक्तव्य केले असल्याचा आरोप काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष कैलास(रणवीर) भगत यांनी केला असून दिवसेंदिवस काँग्रेस उमेदाराला वाढते जनसमर्थन या प्रकाराने महायुतीच्या उमेदवारासह नेत्यांच्याही पायाखालून वाळू सरकत आहे. त्यातच खासदार प्रफुल्ल पटेलांनी वयाची पासष्टी ओलांडल्यामुळे वयोमानानुसार त्यांचे बोलण्यात ताळमेळ नसून लवकरच जीभ घसरत असल्याचे कैलास भगत यांनी सांगितले.
0 टिप्पण्या