कर्मचारी सण साजरा करण्यासाठी पैसा नसल्याने पगारीची वाट पाहत झाले त्रस्त
विजय चौडेकर चित्रा न्युज
नांदेड :-एप्रिल महीना हा भारतीय सणांच्या बाबतीत विविधतेतून एकतेचा संदेश देणारा महीना असतो.
हिंदू मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध सर्वच धर्मीयांचे सण या महीन्यातील दुसऱ्या आठवड्यात आलेले आहेत.
पोलीस, आरोग्य व न्यायालयातील कर्मचारी यांच्या पगारी सोडुन इतर कोणत्याच खात्याच्या दहा तारीख येऊनही अद्याप कर्मचारी यांच्या पगारी न झाल्याने पगारीवर अवलंबून असलेल्या कर्मचारी यांची मोठी हेळसांड या सणासुदीच्या काळात होत आहे. परंतु सरकार चालवणारे पुढारी निवडणुकीत स्वतःच्या पक्षाला निवडुन आणण्यासाठी व्यस्त असल्याने ज्या कर्मचारी यांच्या कामावर सरकारच्या योजना चालतात सरकारचा कारभार हाकला जातो ते सारे कर्मचारी पगार नसल्याने त्रस्त झाले आहेत.
हिंदुंचा सण नव्हे तर हिंदू नव वर्षाचा मोठा सण पाडवा, मुस्लीम धर्मियांच्या पवित्र अशा रमजान महिना व ईदचा सण जवळ आला आहे तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जी भारतातील तमाम मागासवर्गीयांकडून मोठ्या उत्साहात साजरी केली जाते तो ही सण जवळ आला आहे तरी सुद्धा एक दोन खाते सोडून बाकी खात्यातील कर्मचारी यांच्या वेतनासाठी शासनाकडून अनुदानच आलेले नाही त्यामुळे कर्मचारी हताश झाले असुन सण कसा साजरा करायचा या विवंचनेत अडकले आहेत..
कोवीड पासुन वेतन उणे पद्धतीने काढण्याची वित्त विभागाची पद्धती एक दोन खाते वगळता बाकी सर्वच खात्यासाठी अजुनही परत चालु केलेली नाही त्यामुळे कर्मचारी यांच्या वेतनासाठी शासनाकडून अनुदान प्राप्त होईपर्यंत वाट पाहत रहावी लागते. त्यामुळे सर्व कर्मचारी यांचे वेतन वेळेवर होत नाही. बहुतांश कर्मचारी यांना कर्ज हफ्ते, ईएमआय,भिसी, महीनेवारीचे देणे अदा करण्यात अडचणी येत आहेत.. सरकारी नोकरी असुनही वेळेवर देणी अदा करता येत नसल्याने नामुष्कीची वेळ दोष नसतांनाही कर्मचारी यांच्यावर येत आहे. कोवीड पुर्वी चालु असलेली वेतनासाठीची उणे प्राधिकार पद्धती परत चालु करण्यासाठी विविध कर्मचारी संघटनांनी निवेदने देऊनही अद्यापही शासनाकडून बदल करण्यात आला नाही.
दरवर्षी सणासुदीच्या एप्रिल महिन्यात अशाच पेचप्रसंगाला कर्मचारी यांना सामोरे जावे लागत आहे. यावर्षी तरी सरकारने सणासुदीचा विचार करून पगारी लवकर कराव्यात या करीता कर्मचारी सरकारला विनवण्या करत आहेत.
अशातच कान्स्ट्राईब संघटनेकडून ही वेतन सणापुर्वी मिळावे या करीता निवेदन दिले आहे. परंतु पाडव्यालाही वेतन नसल्याने, पगार न झालेल्या कर्मचारी यांना आनंदाची गुढी उभारता आली नाही व घरात मुलांना हिंदू नववर्ष दिवशीही नवे कपडे घेता आले नाहीत दोन दिवसावर रमजान ईद व चार दिवसावर भिमजयंती आली असल्यन कर्मचारी वेतनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सरकारने आतातरी लक्ष देऊन ईद पुर्वीच वेतन अदा करुन कर्मचाऱ्यांना आनंदाने सण साजरा करु द्यावा,कर्मचाऱ्यांची सरकारने दुवा यानिमित्ताने निवडणुकीपुर्वी मिळवावी अशी कर्मचारी वर्गात चर्चा आहे.
1 टिप्पण्या
महत्त्वाची नोंद घेऊन आपण कर्मचाऱ्यांची व्यथा अतिशय योग्य शब्दात मांडली आहे... धन्यवाद 🙏
उत्तर द्याहटवा