• धनलक्ष्मी कॉम्प्लेक्स समोरील महामार्गावरील घटना
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा:- रात्रीचे सुमारास जेवण करून घरासमोरून महामार्गावरून पायी जाणाऱ्या इसमास भरधाव वेगाने आलेल्या ओमनी व्हॅनने धडक दिल्याने पादचारी गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी(ता.८) रात्री ८:३० वाजताच्या सुमारास लाखांदूर ते वडसा राष्ट्रीय महामार्गावरील धनलक्ष्मी कॉम्प्लेक्स समोर घडली. जखमीचे नाव शेखर रंगारी रा. लाखांदूर तर ओमनी व्हॅन चालकाचे नाव संदीप मोहन भेंडारकर(२४) रा. मानेगाव, तालुका लाखांदूर असे आहे. अपघातानंतर त्याने दुचाकीसह रस्ता दुभाजकासही धडक दिल्याचे समजते. लाखांदूर पोलिस पुढील तपास करीत आहेत.
रात्री जेवण आटोपल्यानंतर घरासमोरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर शेखर पत्नीसह फिरण्यासाठी पायी निघाले होते. त्याच वेळी पवनी टी-पॉइंट कडून ओमनी व्हॅन क्रमांक एमएच ३१ सीआर ५३०६ चे चालकाने पेट्रोल भरून लाखांदूर वरून मानेगाव कडे जात असताना चालक संदीप भेंडारकर याने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून पादचारी इसमाला धडक देऊन गंभीर जखमी केले. घटनास्थळालगत असलेल्या नागरिकांच्या अपघात झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी उपचारासाठी जखमीला ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे दाखल केले व घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस उपनिरीक्षक विजयसिंह गोमलाडू, पोलिस हवालदार गोपाल कोसरे, सुभाष शहारे, प्रदीप राऊत, वाहन चालक रवींद्र मडावी घटनास्थळी दाखल होऊन जखमीची भेट घेऊन ओमनी व्हॅन चालकावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. याच ओमनी व्हॅन चालकाने अपघातानंतर अचानक वाहन मागे घेतल्याने दुचाकी क्रमांक एमएच ३६ जे ७३३ ला धडक दिल्याने दुचाकीचे नुकसान झाले. त्यानंतर रस्ता दुभाजकास धडक दिली. त्यात ओमनी व्हॅन चे समोरील चाक पंचर होऊन रस्ता दुभाजकाचे नुकसान झाले आहे. पुढील तपास लाखांदूर पोलिस करीत आहेत.


0 टिप्पण्या