Ticker

6/recent/ticker-posts

वादळी वाऱ्यामुळे सोलर प्लेट चे नुकसान

 केसलवाडा/पवार येथील घटना

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
 भंडारा:- वर्षातून २ ते ३ वेळा पिके घेऊन आर्थिक उन्नती साधावी. या करिता अनेक शेतकऱ्यांनी सिंचनाची सोय केली. वीज बिल परवडत नसल्यामुळे सोलर प्लेटही लावण्यात आले. पण आस्मानी संकटामुळे सोलर प्लेट चे नुकसान झाल्याची घटना बुधवार(ता.८) रोजी केसलवाडा/पवार येथे उघडकीस आली. नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव श्यामराव रामजी येळेकर रा. केसलवाडा/पवार, तालुका लाखनी असे आहे. त्यांनी सोलर प्लेट दुरुस्तीसाठी ईशान सोलर कंपनीकडे अर्ज केला आहे. 
              श्यामराव येळेकर हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यात ते धानाचे पीक घेत असत. कधी अतिवृष्टी तर कधी अवर्षणामुळे पीक पाणी बरोबर येत नव्हते. त्यामुळे कुटुंबाचे भरणपोषण करण्याची समस्या निर्माण होत असे. यावर मात करण्यासाठी त्यांनी सिंचनाची व्यवस्था केली व खरीप आणि रब्बीतही पीक घेऊ लागले. पण वीज बिल अधिक येत असल्यामुळे परवडेनासे होत असे. यावर उपाय म्हणून त्यांनी ईशान सोलर कंपनीचे सोलर पंप बसविले. सर्व व्यवस्थित सुरू असताना बुधवारी(ता.८) मध्यरात्रीच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने श्यामराव येळेकर यांचे शेतातील सौर कृषी पंप कोलमडून खाली पडून सोलर प्लेट चे नुकसान झाले आहे. या प्रकाराने ते सिंचन सोयीस मुकणार आहेत. क्षतीग्रस्त झालेला सौर कृषी पंप दुरुस्त करून देण्यासाठी त्यांनी ईशान सोलर कंपनीला अर्ज दिला असून प्रतिलीपी जिल्हा व्यवस्थापक महाऊर्जा भंडारा यांना दिली आहे. सोलर कंपनीकडून काय कार्यवाही केली जाते. याकडे शेतकऱ्याचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या