Ticker

6/recent/ticker-posts

विश्व हिंदू परिषद अंतर्गत विदर्भ प्रांत मातृशक्ती वर्गाचे आयोजन


रवी भोंगाने साकोली 
साकोली:-३१ मे ते 3 जून २०२४ या दरम्यान साकोली येथील नवजीवन विद्यालयात विश्व हिंदू परिषद अंतर्गत विदर्भ प्रांत मातृशक्ती वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. समाजाचा अर्धा महत्त्वपूर्ण भाग असणाऱ्या महिला, समर्पण भावाने राष्ट्र निर्माण करीत आहेत .ह्याच प्रेरणेने मातृशक्तीने अधिकाधिक कार्यरत होऊन सक्षम व विस्तृत व्हावे यासाठीच या वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.  वर्गाचे संपूर्ण नियोजन विदर्भ प्रांत मातृशक्ती संयोजिका सौ.कांचन ठाकरे यांनी केले आहे. या चार दिवसीय वर्गात प्रामुख्याने केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंदजी परांडे, केंद्रीय प्रण्यासी मंडळ कार्यकारणी सदस्य मीनाताई भट, केंद्रीय सह सत्संगप्रमुख दादा वेदक, विदर्भ प्रांत अध्यक्ष मा. राजेश्वरजी निवल, विदर्भ प्रांत मंत्री प्रशांत तितरे, क्षेत्रीय संघटन मंत्री गोविंद शेंडे यांचे विविध बौद्धिक सत्रात मार्गदर्शन लाभणार आहे.
वर्ग स्थान उपलब्ध करून देणारे वैनगंगा ट्रस्टचे संस्था अध्यक्ष सोमदत्त करंजेकर यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे. राष्ट्रनिर्माणाच्या पुनीत कार्यात सत्संगाचा माध्यमातून कार्यकर्ता मिळविण्यासाठी व राष्ट्रमाता जिजाऊ मुळे शिवबा घडलेत तोच आदर्श पुढे ठेवून बालसंस्कार व्हावेत यासाठी यासंबंधी प्रत्यक्ष कृती सत्राचे आयोजन केले आहे. सोबतच मातृशक्तींना योगासने विविध खेळाबरोबर स्वसुरक्षेसाठी दंडही शिकविला जाणार आहे. मनोरंजन सत्रामध्ये राजमाता देवी अहिल्याबाई होळकर जीवनावर आधारित नाटिका तसेच राष्ट्रनिर्माणात  कार्यात विरांगणांचे योगदान दर्शवणारी नाटिका असर फाउंडेशन तर्फे सादर केली जाणार आहे. महिलांच्या स्वास्थ विषयी जागरूकता व्हावी यासाठी विशेष सत्र आयोजित केले आहे. 
 संपूर्ण मातृशक्तीच्या ४ दिवसीय वर्गात विदर्भ प्रांतातील एकूण अंदाजे २००  दायित्ववान महिला उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती प्रांत संयोजिका कांचन ठाकरे यांनी दिली. संपूर्ण वर्गाची व्यवस्था ही भंडारा जिल्हा मंत्री डाॅ.राकेश सेलोकर तसेच सहमंत्री प्रकाश पांडे आणि नितीन निर्वाण हे बघणार आहे. विभाग मंत्री रमण सिंघल, जिल्हा अध्यक्ष करमसीभाई पटेल, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. वसंत बाळबुधे, दुर्गावहिनी मातृशक्ती पालक सुरेश
पळसावार, प्रांत सह संयोजिका सीमाताई पांढरकर, प्रांत बालसंस्कार प्रमूख अनूराधाताई माने, भंडारा विभाग संयोजीका दीपाताई नायर , साकोली प्रखंड अध्यक्ष ताराचंद लंजे व प्रखंड संयोजक मंगेश कापगते यांचे ही सहकार्य मिळणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या