अर्पित वाहाणे चित्रा न्युज
आगरगावः स्थानिक यशवंत विद्यालय आगरगाव येथे यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा शिक्षण व सहकार महर्षी लोकनेते श्रद्धेय बापूरावजी देशमुख उर्फ दाआजी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक अभय कुंभारे तथा प्रमुख अतिथी म्हणून शशिकांत सानप हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला अभय कुंभारे यांच्या हस्ते श्रद्धेय बापूरावजी देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ. कविता डेकाटे मॅडम यांनी केले, कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता श्री. शशिकांत सानप, अभय कुंभारे ,सौ . कविता डेकाटे व शिक्षकेतर कर्मचारी दिनेश नेहारे यांनी केले


0 टिप्पण्या