Ticker

6/recent/ticker-posts

घरात घुसून तरुणीचा विनयभंग

 


रुपाली डोंगरे चित्रा न्युज 
छत्रपती संभाजीनगर:-तरुणीच्या घरात घुसून त्याने तिच्याशी गैरवर्तन केले. त्याला जमावाने बेदम चोपले. हा प्रकार ६ मे रोजी सकाळी साडेअकरा वाजता सातारा गावात घडला. 
तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहितीनुसार, २० वर्षीय पीडिता कल्पना (नाव काल्पनिक) कुटुंबीयांसह सातारा गावात राहते. ती मार्च २०२३ पासून एका दुचाकी गाड्यांच्या शोरूममध्ये काम करत होती. तेथे आरोपी आदिलही कामाला होता. तेथे त्यांची ओळख झाली होती. तेव्हापासून तो कल्पनाशी बोलण्याचा प्रयत्न करायचा. हा प्रकार कल्पनालाखटकला. त्यामुळे तिने फेब्रुवारी २०२४ मध्ये ते काम सोडले. तेव्हापासून ती घरीच असते. दरम्यान, आदिल हा कल्पनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न करीत होता. त्यामुळे कल्पनाच्या भावाने त्याला समजावले होते. तरीही ६ मे रोजी सकाळी साडेअकरा वाजता कल्पना घरात एकटी असताना आदिल तिच्या घरी गेला. त्याने दरवाजाची कडी वाजविली. दार उघडताच तो घरात घुसला आणि आतून कडी लावून घेतली. पीडिता जोरात ओरडल्यामुळे त्याने तिचे तोंड दाबले. तेवढ्यात शेजारचे नातेवाईक मदतीला धावले. त्यांनी आदिलला तेथेच बेदम चोप दिला. त्यानंतर हा प्रकार सातारा पोलिसांना कळविला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या