Ticker

6/recent/ticker-posts

लग्नाचे आमिष दाखवून नातेवाईकाकडून युवतीचे शारीरिक शोषण

• वरठी पोलिस ठाण्याचे हद्दीतील घटना 

• युवतीचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- नातेसंबंधातील युवकाने मामेबहिणीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करून लग्न न करता फसवणूक केल्याचे पिडीत युवतीचे फिर्यादी वरून वरठी पोलिसांनी युवकावर गुन्हा दाखल केला असून आरोपीचे नाव कैलास बालकदास वैद्य(२९) रा. नेरी, तालुका मोहाडी असे आहे. पोलिस निरीक्षक अभिजित पाटील यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे. वृत्त लिही पर्यंत आरोपी युवकास अटक केली गेली नव्हती. 
                   पिडीत युवतीचा आरोपी युवक हा आत्याचा मुलगा असून लहानपणापासूनच त्याचे पीडितेच्या घडी येणे-जाणे होते. आत्याचा मुलगा असल्याने त्यांच्यात हासीमजाक होत असे. पिडीत युवती महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना २०१६ मध्ये आरोपीने तू मला पसंद आहेस मला तुझे सोबत लग्न करावयाचे आहे. असे बोलून प्रपोज केले. त्यास तिने होकार दिला. तेव्हापासून एकमेकासोबत बोलणे, फिरणे सुरू झाले. ऑगस्ट २०१७ मध्ये कुटुंबीय शेतावर रोवणीसाठी गेले असताना आरोपी युवक पीडितेच्या घरी आला व तुझे सोबत लग्न करणार आहे. असे म्हणून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तो घरी कोणीही नसल्याची संधी साधून वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. त्यास लग्ना विषयी विचारणा केली असता मला ड्युटी लागू दे असे सांगून वेळ मारून नेत होता. आमच्यात अनेकदा शारीरिक संबंध झाल्याने मासिक पाळी आली नाही तेव्हा त्याने प्रेगणेन्सी किट आणून दिली व दिवस गेल्याचे समजताच अबॉर्शन च्या गोळ्या आणून दिल्या. त्या खाल्ल्याने अबॉर्शन झाले. कुटुंबीयांनी लग्नाचा विषय काढल्यामुळे अनेक मुले पीडितेला पाहायला येत असत तेव्हा सुद्धा आरोपीने मी तुझ्याशीच लग्न करणार आहे. असे म्हणून दुसरीकडे लग्न करू नको. असे बोलून शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. 
                 डिसेंबर २०२३ मध्ये आरोपी युवकाचे लग्न जुळल्याचे माहिती होताच पिडीत युवतीने गावच्या तंटामुक्त समितीकडे तक्रार केली होती. प्रकरण अंगलट येणार हे समजल्याने आरोपीने मी तुझ्या सोबत लग्न करतो. या नंतर मी असा करणार नाही. तू मला थोडा वेळ दे. असे बोलला होता. त्यानंतरही आरोपी युवकाने पिडीतेसोबत लग्न केले नसल्यामुळे लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करून पिडीतेशी लग्न न करता फसवणूक केल्याचे पिडीत युवतीचे फिर्यादीवरून वरठी पोलिसांनी अपराध क्रमांक १०१/२०२४ कलम ३७६(२)(एन), ४१७ भादवी अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक अभिजित पाटील यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक मेश्राम तपास करीत आहेत. वृत्त लिही पर्यंत आरोपी युवकास अटक केली गेली नव्हती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या